फोटो सौजन्य: प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम
बॉलिवूड अभिनेत्री प्राजक्ता कोळी लवकरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अभिनेत्री तिच्या नेपाळी बॉयफ्रेंडला गेल्या १३ वर्षांपासून डेट करीत आहे. तिच्या बॉयफ्रेंडचं नाव वृषांक खनाल असं आहे. वृषांक आणि प्राजक्ताने दोन वर्षांपूर्वी त्यानी साखरपुडा केला होता. आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, हे जोडपं २५ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. प्राजक्ताच्या लग्नाबद्दलची माहिती हिंदुस्थान टाईम्सने दिले आहे.
हिंदुस्तान टाईम्सने वृषांक आणि प्राजक्ताच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला आहे आणि त्यासंबंधित काही अधिक माहिती देखील शेअर केली आहे. हिंदुस्थान टाइम्सने सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “प्राजक्ता आणि वृषांक येत्या २५ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. दोघेही याबद्दल खूप आनंदी आणि उत्साहित आहेत. मेहंदी, हळदी आणि संगीत नाईटनंतर हे दोघेही लग्न करतील. त्यानंतर त्यांचा रिसेप्शन सोहळा आयोजित केला जाणार आहे. लग्नाचे कार्यक्रम २३ फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि २५ फेब्रुवारीला प्राजक्ता व वृषांकचे लग्न होईल. लग्नाचे सर्व सोहळे कर्जतमध्ये होणार आहेत.”
प्राजक्ता आणि वृषांकबद्दल बोलायचे झाल्यास, प्राजक्ता अभिनेत्री नव्हती, त्याच्या आधीपासून ते दोघेही एकत्र आहेत. वृषांक हा काठमांडू, नेपाळचा रहिवासी आहे. त्याची आणि प्राजक्ताची एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाली होती. गणपती पूजेदरम्यान दोघेही एकमेकांना भेटले होते. इथेच वृषांकने प्राजक्ताला डेटसाठी विचारलं होतं, त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि ते प्रेमात पडले. वृषांक हा वकील आहे.
‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर प्रस्थापित केला नवा विक्रम, ऐतिहासिक कथा असलेल्या चित्रपटाची चाहत्यांना भुरळ
प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, प्राजक्ता ‘मिसमॅच्ड’ नावाच्या वेब सिरीजमध्ये दिसली आहे. त्या सीरिजचा तिसरा सीझन डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झाला. याशिवाय, अभिनेत्री वरुण धवन, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर यांच्यासोबत ‘जुग जुग जिओ’ चित्रपटातही दिसली आहे. यापूर्वी, प्राजक्ता कोळी भारती सिंगच्या पॉडकास्टवरही दिसली होती, जिथे तिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला होता. तिने त्याच्याबद्दल सर्व माहिती भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये सांगितली होती.
वृषांक मुळचा काठमांडू, नेपाळचा आहे. तो एक वकील असून तो एका इन्वेस्टमेंट बँकेत काम करतो. प्राजक्ताने एक पुस्तकही लिहिलं आहे. तिने ‘टू गुड टू बी ट्रू’नावाच्या पुस्तकाचं लेखन केलं आहे. तिचं हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. याशिवाय तिची ‘अंधेरा’ नावाची हॉरर सीरीजही प्रदर्शनाच्या तयारीत आहे.