'छावा'ने बॉक्स ऑफिसवर प्रस्थापित केला नवा विक्रम, ऐतिहासिक कथा असलेल्या चित्रपटाची चाहत्यांना भुरळ
सिनेमा प्रेमी, इतिहासप्रेमी आणि ॲक्शनच्या चाहत्यांसाठी भव्य ब्लॉकबस्टरचे पदार्पण झालेले आहे, जी थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत आहे! छावा, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट, केवळ एक चित्रपट नसून मोठ्या पडद्यावर अनुभवण्याजोगी अद्वितीय पर्वणी आहे. विकी कौशल आपल्या करिअरमधील सर्वोत्तम भूमिकेत छत्रपती संभाजी महाराजांना इतक्या उत्कटतेने साकारतो आहे की प्रेक्षक पूर्णपणे मंत्रमुग्ध झाले आहेत.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून छावा थिएटरमध्ये अपूर्व यश मिळवत आहे आणि पीव्हीआर आयनॉक्स सिनेमांमध्ये आठवड्याच्या दिवशी विक्रमी 35% प्रेक्षक उपस्थिती कायम राखत आहे. या प्रचंड यशात आणखी भर घालत, हा चित्रपट आता महाराष्ट्र आणि गोव्यात करमुक्त घोषित करण्यात आला आहे, ज्यामुळे तो अधिकाधिक प्रेक्षकांसाठी सुलभ झाला आहे. अहवालांनुसार लवकरच आणखी एक राज्यही करमुक्त घोषणेचा विचार करत आहे, त्यामुळे चित्रपटाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे.
पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडचे सीईओ, गौतम दत्ता म्हणतात, “महाराष्ट्र आणि गोव्यात छावाला मिळालेल्या करमुक्त दर्जामुळे तो एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कलाकृती ठरत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये अपूर्व उत्साह निर्माण केला असून, प्रभावी ऐतिहासिक कथनाची अजरामर जादू सिद्ध केली आहे. काल, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटर्समध्ये दाखल झाले आणि या महान योद्ध्याच्या वैभवशाली वारशाचा उत्सव साजरा केला, परिणामी पश्चिम भारतातील आमच्या सिनेमागृहांमध्ये तब्बल 75% प्रेक्षक उपस्थिती नोंदवली गेली! हा प्रतिसाद चित्रपटाच्या भव्यता, ऐतिहासिक विश्वासार्हता आणि विकी कौशलच्या प्रभावी अभिनयाचा ठोस पुरावा आहे, जो मोठ्या पडद्याच्या अनुभवाची जादू अधिकच बळकट करतो.”
“उभे रहा, नजर काढायचीये तुमची…” घरकाम करणाऱ्या आशाताईंनी विकी कौशलची दृष्ट काढली; Video Viral
थिएटर्समध्ये छावा का पाहावा?
दमदार अभिनय
विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. त्यांचा शौर्य, दृढनिश्चय आणि अदम्य आत्मविश्वास मोठ्या पडद्यावर जिवंत होतो. त्यांच्या तीव्र अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांकडून एकमुखी प्रशंसा मिळाली आहे. रश्मिका मंदान्ना यांनी साकारलेली येसूबाई ही भूमिका चित्रपटाला भावनिक खोली देते. तसेच, अक्षय खन्ना यांनी उलगडलेला औरंगजेब हा धैर्यशून्य आणि निर्दयी खलनायक चित्रपटाच्या नाट्यमयतेला एका वेगळ्या उंचीवर नेतो, जो प्रेक्षकांच्या मनात कायमचा ठसतो.
इतिहासात कोरलेली कहाणी, उत्कटतेने मांडणी
प्रख्यात मराठी साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या गाजलेल्या कादंबरी “छावा” वर आधारित हा चित्रपट संभाजी महाराजांच्या संघर्ष आणि विजयांची थरारक कहाणी उलगडतो. त्यांच्या बालपणापासून ते मुघलांविरुद्ध लढलेल्या निर्णायक युद्धांपर्यंत, ही कथा अखंड इच्छाशक्ती आणि पराक्रमाने इतिहास घडवणाऱ्या योद्ध्याची जिवंत साक्ष आहे.
अखेर ठरलं! सौरव गांगुलीचा बायोपिक येतोय, प्रमुख भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता…
बॉक्स ऑफिसवर शानदार यश आणि प्रेक्षकांचा उत्साह
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून विक्रमी यश मिळवत, छावाने केवळ पाच दिवसांत जगभरात सुमारे ₹200 कोटींची कमाई केली आहे. हा विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनिंग ठरला असून, त्याचा सातत्याने वाढणारा प्रतिसाद सिद्ध करतो की प्रेक्षकांना हा ऐतिहासिक चित्रपट अपार आवडत आहे. चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील वर्चस्व हे त्याच्या प्रभावी कथानकाची आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची साक्ष आहे.
भव्य सिनेमॅटिक सौंदर्य
या चित्रपटाची नेत्रदिपक सिनेमॅटोग्राफी, भव्य युद्धदृश्ये आणि भव्य ऐतिहासिक सेट प्रेक्षकांना थेट 17व्या शतकातील भारतात घेऊन जातात. प्रचंड प्रमाणावर उभारलेल्या निर्मितीमुळे आणि अचूकपणे सादर केलेल्या युद्धकलांच्या दृश्यांमुळे हा चित्रपट दृश्यदृष्ट्या प्रभावी आणि थरारक अनुभव देतो, जो फक्त थिएटरमध्येच खऱ्या अर्थाने अनुभवता येतो.
भावनिक आणि देशभक्तीने भारलेला चित्रपट
छावा हा केवळ युद्धाची कहाणी नाही, तर तो शौर्य, बलिदान आणि जनतेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या महान योद्ध्याच्या अदम्य आत्म्याचे प्रतीक आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना भावूक केले, मराठा अभिमानाबद्दल नव्या चर्चा सुरू केल्या आणि प्रभावी सिनेमॅटिक कथनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.
भरगच्च थिएटरमध्ये, आपल्या सभोवताल असलेल्या लोकांबरोबर हेच भावनांचे हेलकावे घेत हा चित्रपट पाहण्याचा अनुभव अत्यंत प्रभावी आणि रोमांचक ठरतो. पी (एक्सएल), आयमॅक्स आणि 4डीएक्स यांसारख्या अत्याधुनिक फॉरमॅट्ससह पीव्हीआर आयनॉक्स मध्ये हा चित्रपट पाहण्याचा थरार आगळा-वेगळा आहे. प्रत्येक युद्धघोष ऐका, प्रत्येक ऐतिहासिक क्षण अनुभवा आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांच्या नव्या युगाचा भाग बना!