Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या मामांच्या नव्या मालिकेची तारीख अन् वेळ ठरली; महानायक अशोक सराफ झळकणार छोट्या पडद्यावर

आज अनेक वर्षांनंतर अशोक मामांना पुन्हा छोट्या पडद्याने खुणावलं, ते 'कलर्स मराठी'वर येणाऱ्या 'अशोक मा.मा.' या मालिकेने. 25 नोव्हेंबरपासून ही मालिका 'कलर्स मराठी'वर पाहायला मिळणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 19, 2024 | 03:57 PM
महाराष्ट्राच्या मामांच्या नव्या मालिकेची तारीख अन् वेळ ठरली; महानायक अशोक सराफ झळकणार छोट्या पडद्यावर

महाराष्ट्राच्या मामांच्या नव्या मालिकेची तारीख अन् वेळ ठरली; महानायक अशोक सराफ झळकणार छोट्या पडद्यावर

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ म्हणजेच आपले लाडके अशोक मामा. विनोदाचा बादशहा म्हणून त्यांची ओळख असली तरी हसता हसता डोळ्यातून पाणी आणणाऱ्या भावना निर्माण करणं ही सुद्धा त्यांची खासियत आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. अशोक मामांनी आजपर्यंत हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेविश्वावर अधिराज्य केलं. 2006 साली ते करत असलेली प्रसिद्ध हिंदी मालिका ‘हम पांच’ संपली तेव्हापासून त्यांनी मालिकाविश्वातून रजा घेतली. त्यानंतर ते छोट्या पडद्यावर मालिकेमध्ये कधी दिसले नाहीत. पण आज अनेक वर्षांनंतर अशोक मामांना पुन्हा छोट्या पडद्याने खुणावलं, ते ‘कलर्स मराठी’वर येणाऱ्या ‘अशोक मा.मा.’ या मालिकेने. 25 नोव्हेंबरपासून ही मालिका रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांना आपल्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा- सुष्मिता सेनने तिच्या दोन्ही लेकींना शिकवला आदर मिळवण्याचा योग्य मार्ग, तुमच्याही मुली ठरतील खास द्या ‘अशी’ शिकवण

‘अशोक मा.मा.’ या मालिकेचा विषय ऐकूनच इतके वर्ष टेलिव्हिजनसोबत घेतलेला दुरावा मामांनी संपवायचा ठरवला. एक वेगळा विषय करायला मिळतो आहे म्हणून ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. सुप्रसिद्ध लेखक आणि कलाकार चिन्मय मांडलेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेली ‘अशोक मा.मा.’ ही मालिका मजेदार, खुमासदार आहे. या मालिकेत अशोक मामांसह ‘कलर्स मराठी’च्या ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली रसिका वाखारकर, नेहा शितोळे, चैत्राली गुप्ते हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. केदार वैद्य दिग्दर्शित या मालिकेची प्रेक्षकांना आता प्रतीक्षा आहे.

 

‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे मालिकेबद्दल म्हणाले,”अशोक मा.मा. या मालिकेच्या माध्यमातून अनेक वर्षांनी मामा आता छोटा पडदा काबीज करणार आहेत. ‘अशोक मा.मा.’ ही मालिका तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारी तर आहेच पण त्याच सोबत तुमच्या भावनेला हात घालणारी आहे, मनाला स्पर्शून जाणारी आहे. हसवता हसवता डोळ्यातून पाणी आणणारी आहे. दिग्दर्शन, लेखन, कलाकार या सर्व तगड्या गोष्टींचं उत्कृष्ट मिश्रण असणारी ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. मामांना अनेक वर्षानंतर छोट्या पडद्यावर आणण्याचं इंद्रधनुष्य प्रॉडक्शन हाऊसह वाहिनीनेदेखील उचललं आहे. त्यामुळे आमच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी आहे”.

हे देखील वाचा- अल्लू अर्जुन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, ‘पुष्पा २’च्या कथेत पाहायला मिळणार नवीन ट्विस्ट आणि टर्न!

रिटायरमेंटच्या वयात असलेले अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे असे अशोक मा. मा. मुंबईत राहत आहेत. त्यांच्या एकाकी आयुष्यात येणारे अनेक इरसाल नमुने आणि त्यांच्या सोबत येणारे अनेक धमाल मजेदार अनुभव आणि त्यातून उलगडत जाणारं अशोक ह्या पात्राच भावविश्व आणि त्याच्या सरळसाध्या आयुष्यात एक असं वादळ येतं ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य ढवळून निघत.. हे वादळ काय असतं? त्यामुळे अशोकच्या शिस्तप्रिय आयुष्याला काय कलाटणी मिळते? हे गोष्टी सोबत उलगडत जातं.

Web Title: Colors marathi serial ashok ma ma telecast 25 novermber 2024 see new promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 03:57 PM

Topics:  

  • ashok saraf
  • colors marathi
  • marathi actor

संबंधित बातम्या

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
1

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना
2

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना

महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट
3

महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट

दिवंगत अभिनेते राजेश पिंजानी यांचा शेवटचा चित्रपट, ‘गोट्या गँगस्टर’चा टीझर लाँच
4

दिवंगत अभिनेते राजेश पिंजानी यांचा शेवटचा चित्रपट, ‘गोट्या गँगस्टर’चा टीझर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.