मराठी सिनेमासृष्टीतील एक दुःखद बातमी आज समोर आली आहे. आपला सगळ्यांचा आवड गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्या आईला देवाज्ञा झाली आहे. मृदगंधा गुप्ते हे अवधूतच्या आईचे नाव असून, त्या बऱ्याच वेळ मुंबईमधील व्होकार्ट रुग्णालयात रुग्णालयात ऍडमिट होत्या आणि त्यांच्या वर उपचार सुरु होते. पण मात्र उपचार सुरु असूनसुद्धा त्या उपचारांना यश मिळाले नाही आणि त्या रुग्णालयात मृदगंधा गुप्ते यांनी अखेरचा श्वास घेतला.
मृदगंधा गुप्ते यांचे निधन झाले असून, आज अंत्यदर्शनानंतर दौलतनंगर बोरिवली ईस्ट येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे. एका मुलाखतीत अवधूतने त्याचा आईचा एक किस्सा सांगितला होता. अवधूत म्हणाला की, अलीकडे जीवन थोडे त्रासदायक होते, पण काही काळानंतर सगळे चांगले झाले. माझ्या आईला अपोलो, चेन्नई येथे मिळालेल्या उपचारांचा खूप फायदा झाला. फुफ्फुसातील फायब्रोसिस ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यासाठी विशेष उपचारांची आवश्यकता असते. आईआपल्या मुलांना जीवन देत देतात. पण असे काही भाग्यवान असतात जे त्यांच्या आईला जीवनदान देतात, त्यांचे प्राण वाचवू शकतात. तिच्यात खूप सुधारणा झाल्यामुळे मला खूप आनंद झाला.
आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत नियमित चांगले वागत राहा असे माझी आई नेहमी मला शिकवायची. लहानपणीही मी बसण्याऐवजी बसण्याऐवजी घरी आलेल्या पाहुण्यांसोबत गुंतून राहायचो. मी माझ्या सभोवतालच्या लोकांसोबत आपुलकीने वागून मोठा झालो आहे. असे त्यांचे म्हणणे होते.
[read_also content=”उत्सुकता, आव्हानं आणि बरच काही असे का म्हणते अमृता खानविलकर ! https://www.navarashtra.com/movies/why-amruta-khanvilkar-says-curiosity-challenges-and-many-more-545481.html”]
पुढे तो म्हणाला, रिॲलिटी शोच्या जजच्या भूमिकेत असताना स्पर्धकांवर टीका करण्याऐवजी मी त्यांना प्रोत्साहन देत होतो. त्यामुळे त्यांना माझ्यासोबत आणि इतर प्रत्येकासोबत सोयीचे वाटते. मी चाहत्यांसह सेल्फी घेण्यास कधीही नकार दिला नाही, मग ते कितीही कंटाळवाणे असले तरीही मी त्यांना सेल्फी देतो. त्यांच्या माझ्याबद्दलच्या भावनांची ही पोचपावती आहे मी माझ्या चाहत्यांचे ऋणी आहे. मी एक अशी व्यक्ती आहे जो मला शत्रू नसल्याचा दावा करू शकतो आणि हे सर्व तिच्यामुळे शक्य आहे.






