Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण, केव्हा होणार रिलीज

इ. स. १७६७ ते इ. स. १७९५ या काळात राज्य करणाऱ्या भारतातील माळव्यातील तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाईंची कहाणी चित्रपटातून जगासमोर येणार आहे. चित्रपटात शूर पराक्रमी महाराणींची यशोगाथा पाहायला मिळेल

  • By चेतन बोडके
Updated On: May 09, 2025 | 07:55 PM
छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते 'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण, केव्हा होणार रिलीज

छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते 'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण, केव्हा होणार रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये अजरामर झालेली बरीच कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे अलीकडच्या काळात रुपेरी पडद्यावर अवतरलेली पाहायला मिळाली आहेत. या व्यक्तिरेखांच्या आधारे इतिहासातील सुवर्ण अध्याय आजच्या पिढीसमोर आले आहेत. आपल्या पराक्रमाने इतिहास गाजवणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांपैकी एक महाराणी अहिल्याबाई होळकर होत्या. इ. स. १७६७ ते इ. स. १७९५ या काळात राज्य करणाऱ्या भारतातील माळव्यातील तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाईंची कहाणी चित्रपट रूपात जगासमोर येणार आहे. ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर – एक युग’ या चित्रपटात शूर पराक्रमी महाराणींची यशोगाथा पाहायला मिळणार आहे. २३ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘छावा’नंतर संतोष जुवेकर नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर रिलीज

नितीन धवने फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ या चित्रपटाची निर्मिती निर्माते सोमनाथ शिंदे यांनी लयभारी प्रोडक्शनच्या बॅनरखाली केली आहे. नितीन धवने पाटील या चित्रपटाचे सह निर्माते तसेच प्रस्तुतकर्ते आहेत. लेखक-दिग्दर्शक सुशांत सोनवले यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करत रसिकांना सतराव्या शतकात नेण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज लोकनेते व माजी लोकसभा सदस्य छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक, कलाकार राहुल राजे, सुहास जाधव, संदेश कदम व तंत्रज्ञांची टिम उपस्थित होती. ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’च्या संपूर्ण टिमचे कौतुक करत मा. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी चित्रपटाला भरभरून शुभेच्छा दिल्या.

चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक सुशांत सोनवले म्हणाले की, इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील पराक्रमी व्यक्तिरेखा आजच्या पिढीसमोरच नव्हे, तर सदा सर्वकाळ आदर्श निर्माण करणाऱ्या आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने एका लढाऊ महाराणीची शौर्यगाथा जगासमोर येणार आहे. महाराष्ट्राला जशी थोर संतांची आणि पराक्रमी वीरांची परंपरा लाभली आहे तशीच अहिल्याबाईंसारख्या रणरागिणींचीही परंपरा आहे. हा चित्रपट केवळ एक कलाकृती नव्हे, तर अहिल्याबाईंच्या चरित्रगाथेचे डॅाक्युमेंटेशन ठरावे, अशी भावनाही दिग्दर्शक सुशांत सोनवले यांनी यावेळी व्यक्त केली.

अक्षय केळकरने ‘रमा’सोबत अखेर संसार थाटला, लग्नातला पहिला फोटो समोर

चित्रपट-मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने या चित्रपटात अहिल्याबाईंची व्यक्तिरेखा साकारली आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरवर अश्विनीच्या रूपातील अहिल्याबाईंचा लढाऊ बाणा पाहायला मिळतो. याखेरीज चित्रपटातील इतर महत्त्वाच्या व्यक्तिरेखाही ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’च्या पोस्टरवर आहेत. या चित्रपटात अश्विनी महांगडेच्या जोडीला राहुल राजे, सुहास जाधव, संदेश कदम, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, संजय खापरे, सुनील गोडसे, संजीवनी जाधव, शिवा रिंदानी आदी कलाकार आहेत. चित्रपटातील गीते गुरू ठाकूर आणि प्रियंका शेडगे यांनी लिहीली असून, संगीत शुभम पाटणकर यांनी दिले आहे. यातील नंदेश उमप यांच्या पहाडी आवाजातील पोवाडा वीररस जागवणारा आहे. याखेरीज सागर भोसले यांनीही या चित्रपटातील गीते गायली आहेत. संकलन ओम पाटील यांनी केले असून, डीआय विनोद राजे यांनी केले आहे. सलमान मुलानी आणि सुनीत व्यास यांनी व्हिएफएक्सचे काम केले आहे. दादा शिंदे व धनाजी शिंदे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

Web Title: Dharmarakshak ahilyadevi holkar movie marathi lead role play in actress ashwini mahangade this movie poster released on chhatrapati udayanraje bhosle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 07:55 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!
1

”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज
2

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
3

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

”यापेक्षा मोठं भाग्य नाही..” संभवामी युगे युगे’वर बोलताना अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केल्या भावना व्यक्त, म्हणाली…
4

”यापेक्षा मोठं भाग्य नाही..” संभवामी युगे युगे’वर बोलताना अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केल्या भावना व्यक्त, म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.