Akshay Kelkar Got Married To Sadhana Kakatkar Actress Amruta Dhongde Shared First Photo
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) लग्नबंधनात अडकला आहे. आज ९ रोजी अभिनेत्यानं त्याची गर्लफ्रेंड साधना काकटकरसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची इनिंगला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. अखेर अभिनेत्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्याच्या लग्नातील आता पहिला वहिला फोटो समोर आला आहे. बिग बॉस मराठी ४ फेम अभिनेत्री अमृता धोंगडेने त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
बिग बॉस मराठीच्या विजेत्याला लागली हळद, अभिनेत्याच्या मित्रांनी केली धमाल; Video Viral
बिग बॉस मराठी ४ चा विजेता झाल्यानंतर अक्षय केळकरला विशेष प्रसिद्धी मिळाली. अक्षयने आपल्या अभिनयासोबतच उत्तम निवेदनानेही प्रेक्षकांची मनं जिंकले. ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमामध्ये अक्षयने होस्टिंग करत चाहत्यांचेही खळखळून मनोरंजन केले. अक्षय सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ७ मे पासून अक्षयच्या लग्नाच्या आधींच्या विधींना सुरुवात झाली. अखेर आज ९ मे रोजी अक्षयने गर्लफ्रेंड ‘रमा’ म्हणजेच साधना काकटकरसोबत लग्नगाठ बांधली. अक्षय- साधनाच्या लग्नाला मराठी फिल्म इंडस्ट्रीसह अनेक कलाकारांनी लग्नाला हजेरी लावली होती. अद्याप अक्षयच्या लग्नातील फोटोसमोर आलेले नाहीत. परंतु अक्षयच्या लग्नातील सुंदर क्षण अभिनेत्री अमृता धोंगडे हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय.
अभिनेत्री तृप्ती बर्डेचा फरहान अख्तरवर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
बिग बॉस मराठी ४ फेम अभिनेत्री अमृता धोंगडे हिने अक्षय आणि साधनासोबतचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. अमृता धोंगडेने शेअर केलेल्या फोटोमध्ये रिसेप्शनमध्ये अक्षय आणि त्याच्या पत्नीने खूप सुंदर लूक केलेला दिसून येत आहे. लाल रंगाच्या साडीत साधना अतिशय सुंदर दिसतेय. तर काळ्या रंगाच्या सूटमध्ये अक्षयदेखील राजबिंडा दिसतोय. अक्षय आणि साधनाच्या मुख्य लग्नविधींचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. लग्नातील फोटो आता अक्षय कधी सोशल मीडियावर शेअर करतो, याकडे चाहत्याचं लक्ष लागलं आहे. अमृताने शेअर केलेला हा फोटो साधना-अक्षय यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील असल्याचा अंदाज आहे. हा स्पेशल फोटो शेअर करत तिने नवविवाहित दाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘Sitaare Zameen Par’ चित्रपगृहानंतर होणार नाही ओटीटीवर रिलीज? जाणून घ्या कुठे होईल प्रदर्शित
अक्षय- साधनाचा हळदीचा कार्यक्रम ०८ मे रोजी पार पडला. अक्षयच्या हळदी सोहळ्याला प्रथमेश परब, समृद्धी केळकरसारख्या लोकप्रिय कलाकारांनी अक्षयच्या घरी जोरदार धमालमस्ती केलेली पाहायला मिळाली. या लोकप्रिय कलाकारांनी त्यांच्या मेहंदी सोहळ्यातही धमालमस्ती केली. गेल्या दहा वर्षांपासून साधना आणि अक्षय रिलेशनशिपमध्ये होते. त्यांची आधी फ्रेंडशिप होती, फ्रेंडशिपचं रुपांतर रिलेशनशिपमध्ये झालं. आता त्यांच्या प्रेमाचं रूपांतर लग्नात होणार आहे. अक्षय- साधनाच्या मित्रांनी लग्नासाठी खास ‘#रमाक्षय’ हा खास हॅशटॅगही तयार केलाय. अक्षय- साधनाच्या मेहंदीचीही बरीच चर्चा रंगली. अक्षय त्याच्या गर्लफ्रेंडला लाडाने ‘रमा’ म्हणतो. त्यामुळेच त्याने लग्नासाठी असा खास पद्धतीने हॅशटॅग बनावला होता.
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, भारत-चीन युद्ध दिसणार रुपेरी पडद्यावर
अक्षयने त्याच्या होणाऱ्या बायकोच्या तिच्या मेहंदीमध्ये एका हातावर विठोबा आणि दुसऱ्या हातावर रुक्मिणीचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे या मेहंदीने लक्ष वेधलं. तर अक्षयने #रमाक्षय असं त्याच्या मेहंदीने हातावर लिहिलं. डिसेंबर २०२४ मध्ये अक्षय केळकरने त्याची गर्लफ्रेंड साधना काकटकरची ओळख सोशल मीडियावर करून दिली होती. जवळपास १० वर्षांपासून दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत. साधना ही गायिका असून अनेक लोकप्रिय मराठी अल्बम साँग्स गायले आहेत.