गेल्या काही दिवसात मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. मगंळवारी सकाळीही मनोरंजन सृष्टीतुन दुखद बातमी समोर आली. चित्रपट निर्माते धीरजलाल शाह यांचं निधन (Dhirajlal Shah Death) झालं आहे. सोमवारी, 11 मार्च रोजी त्यया जगाचा निरोप घेतला. त्यांचे भाऊ हसमुख यांनी त्यांच्या निधन झाल्याचं सांगितलं. धीरजलाल शाह यांना कोवीड झाला होता त्यांनर त्यांच्या फुफ्फुसात समस्या निर्माण झाली. यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 20 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. काल उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली.
[read_also content=”या आठवड्यात OTT वर हॉरर-थ्रिलर क्राईम वेबसिरिज-चित्रपटांची मेजवानी, घरी बसुन घ्या आनंद! https://www.navarashtra.com/movies/ott-releases-this-week-murder-mubarak-main-atal-hoon-lal-salaam-bramayugam-hanuman-big-girls-dont-cry-march-514758.html”]
धीरज लाल शाह यांनी अक्षय कुमारच्या हिट खिलाडी फ्रँचायझीचे सर्व चित्रपट सादर केले आणि अजय देवगण स्टारर ‘विजयपथ’लाही पाठिंबा दिला. धीरज लाल शाह यांनी अनिल शर्माच्या ‘द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ची निर्मिती केली होती, ज्यात सनी देओल, प्रीती झिंटा आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होते.
धीरजलाल शाह यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना अनिल शर्मा म्हणाले, ‘ते केवळ एक चांगले निर्मातेच नव्हते तर ते खूप चांगले माणूसही होते. त्यांनी व्हिडीओजचे एक जग तयार केले होते जे एक प्रकारे क्रांतिकारी होते. आम्ही त्याला मिस करू. दरम्यान, निर्माते हरीश सुगंध म्हणाले, ‘त्याने शहेनशाहच्या व्हिडिओचे हक्क विकत घेतले, त्यानंतर त्याचे आयुष्य बदलले आणि तो व्हिडिओ किंग बनला. जवळपास सर्वच चित्रपटांचे हक्क त्यांच्याकडे होते.