दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे. मात्र त्यावरून राजकारणही तापताना दिसत आहे. सध्या आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यात केजरीवाल यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपटावर केलेल्या भाष्यावरून विवाद सुरूच आहे तो पर्यंत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावर आता भाजपाही चांगलीच संतापलेली दिसत आहे. तर आता चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेत भाजपा गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी गुरुवारी केला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत शरद पवारांच्या या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे,
I met Shri @PawarSpeaks ji and his respected wife just s few days ago in a flight, touched their feet and both of them congratulated and blessed me and Pallavi Joshi on the film. Don’t know what happened to him in front of media. Despite blatant hypocrisy, I respect him https://t.co/HHQh9nLZvg
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 1, 2022
“काही दिवसांपूर्वी विमान प्रवासादरम्यान मी शरद पवार आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतली होती. यावेळी मी पाया पडलो असता दोघांनीही माझं अभिनंदन करत मला आणि माझी पत्नी पल्लवी जोशीला शुभेच्छा दिल्या होत्या. मीडियासमोर त्यांना काय झालं माहिती नाही. उघड ढोंगीपणा दिसत असतानाही मी त्यांचा आदर करतो,” असं विवेक अग्निहोत्री म्हणाले आहेत.
पवार आणि अग्निहोत्रींचा ट्विटरवही सामना पाहायला मिळाला. त्यांनी पवारांना ट्विटरवरही उत्तर दिलं होतं.
आझादी के बाद पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी और राजीव गांधी इन्होने देश को एक नई दिशा दिखाई। राष्ट्रवादी काँग्रेस की मूल विचारधारा एक ही है, सिर्फ काम करने का तरीका अलग है।
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2022
माननीय @PawarSpeaks जी, भारत जैसे गरीब राष्ट्र में आपके हिसाब से एक राजनेता के पास अपनी क़ाबिलियत से कमायी, ज़्यादा से ज़्यादा कितनी संपत्ति होनी चाहिए?
भारत में इतनी ग़रीबी क्यों है, यह आपसे बेहतर कौन जनता है। ईश्वर आपको लम्बी आयु दे, सदबुद्धि दे। https://t.co/ORv6z4HUyq
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 1, 2022
याशिवाय भाजपानेही या वक्तव्यावर टिका केली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया देत उत्तर देताना फडणवीस यांनी हसून, म्हटलं, “अलीकडच्या काळात राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल यांच्यामध्ये अल्संख्यांक मत मिळवण्यासाठी चढाओढ लागलीय त्यातून अशी वक्तव्य येतायत,” अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.