Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफर

हरिनामाच्या गजरात , टाळ- मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळण्यात दंग झालेले वारकरी आणि अंभगांच्या स्वरात चिंब झालेले प्रेक्षक अशा भक्तिमय वातावरणात ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा पार पडला.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 06, 2025 | 08:11 PM
हरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफरहरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफरहरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफरहरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफरहरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफरहरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफर

हरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफरहरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफरहरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफरहरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफरहरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफरहरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफर

Follow Us
Close
Follow Us:

हरिनामाच्या गजरात , टाळ- मृदुंगाच्या तालावर, फुगड्या खेळण्यात दंग झालेले वारकरी, पायांनी धरलेला ठेका, अंभगांच्या स्वरात चिंब झालेले मायबाप प्रेक्षक आणि कृतज्ञता सन्मान अशा भक्तिमय वातावरणात नुकताच ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा भव्य- दिव्य आध्यात्मिक ट्रेलर लाँचिंग सोहळा पार पारडला. या सोहळ्यात चित्रपटातील कलाकाराही वारकऱ्यांसोबत भक्तीत तल्लीन होताना पाहायला मिळाले. काही वेळासाठी तरी का होईना आपले आवडते कलाकार मंडळी सुद्धा वारकरी झालेले पाहायला मिळाले.

गौतमी पाटीलची पहिली गवळण ‘कृष्ण मुरारी’प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या गाण्याची जोरदार चर्चा, पाहा खास झलक

भव्य दिव्य आणि आध्यात्मिक असलेला चित्रपटाचा नेत्रदीपक ट्रेलर लाँचिंग सोहळा नुकताच पार पडला. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या ट्रेलरला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती परोपकारी।।

संत पंरपरेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे अद्वितीय योगदान आहे. मराठी भाषेचा अभिमान, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग सर्वसामान्यांना दाखवला. तसेच आध्यात्मिक समतेचा आधार घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायची सुरुवात केली. ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या तिन्ही भावंडांना आयुष्यभर समाजाकडून वाईट वागणूक मिळाली.

परंतु, खचून न जाता त्यांनी आणि त्यांच्या भावंडांनी भागवत संप्रदायाच्या शिकवणीत आपले स्थान निर्माण केले. या भावंडांच्या संतपणाची महती सांगत मुक्ताईच्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा हा चित्रपट आहे. विश्वाला मांगल्य प्रदान करणाऱ्या या भावंडांचे अजोड कार्य आणि विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले.

२०० कोटींच्या ‘सिकंदर’ला १०० कोटी कमावणंही कठीण, सातव्या दिवशीही भारतात केली तुटपुंजी कमाई

संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे, संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक, संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर, संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी साकारली आहे. शिवाय समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

ईडीची ‘L2: Empuraan’च्या निर्मात्यांच्या घरावर छापेमारी! कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन जप्त

Web Title: Digpal lanjekar sant dnyaneshwaranchi muktai marathi movie trailer release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 08:11 PM

Topics:  

  • marathi movie
  • saint dnyaneshwar

संबंधित बातम्या

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam: सिनेमाच्या टिमकडून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रपट शो
1

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam: सिनेमाच्या टिमकडून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रपट शो

‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील –  सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड
2

‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील – सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

मुखवट्याच्या मागची रहस्यं, 4 खून, शून्य पुरावे…”; ‘केस नं. ७३’ चित्रपटाचे मोशन पोस्टर चर्चेत
3

मुखवट्याच्या मागची रहस्यं, 4 खून, शून्य पुरावे…”; ‘केस नं. ७३’ चित्रपटाचे मोशन पोस्टर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.