gautami patil krishna murari song released video viral on social media
गौतमी पाटील(Gautami Patil) आणि वाद हे काही महाराष्ट्राला नवीन नाही. गौतमी पाटीलचा जिथे कार्यक्रम असेल तिथे वाद हे समीकरण झाले आहे. आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गौतमी पाटीलने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत त्यासोबतच मराठी फिल्म इंडस्ट्रीतही आता गौतमी पाटीलचं नाव चर्चेचा मुद्दा ठरला आहे. कायमच आपल्या डान्सने चर्चेत राहणाऱ्या गौतमीने गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर एका नवीन गाण्याचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता. आता हे गाणं रिलीज झालं असून गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
२०० कोटींच्या ‘सिकंदर’ला १०० कोटी कमावणंही कठीण, सातव्या दिवशीही भारतात केली तुटपुंजी कमाई
आपल्या डान्समुळे चर्चेत राहणाऱ्या गौतमी पाटीलची नुकतीच पहिलींच गवळणं प्रदर्शित झाली आहे. तिच्या पहिल्या गवळणीचं नाव “कृष्ण मुरारी” असं असून सध्या ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत, गौतमी पाटीलच्या नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच तिने या गाण्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
या गाण्यात ती गोपिकेच्या भूमिकेत दिसत असून श्री कृष्णाची आराधना करताना दिसत आहे.“कृष्ण मुरारी” या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलार हिने हे गाणं गायलं असून विशाल शेलार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचे संगीत आयोजन आदित्य पाटेकर व करण वावरे यांनी केले आहे. कृष्ण मुरारी या गाण्याचे चित्रीकरण पुण्यात करण्यात आले आहे. परंतु हे गाणं पाहताना वृंदावनात असल्याचा भास होतो.
ईडीची ‘L2: Empuraan’च्या निर्मात्यांच्या घरावर छापेमारी! कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन जप्त
गौतमी तिच्या पहिल्या गवळणविषयी आणि गाण्याबद्दल सांगते की, “लोकसंगीतातील गवळण हा नृत्यप्रकार मला फार आवडतो. माझी खूप दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्यामुळे माझी इच्छापूर्ती झाली. त्यामुळे मी साईरत्न एंटरटेन्मेंट आणि निर्माते संदेश गाडेकर व सुरेश गाडेकर यांचे मनापासून आभार मानते. माझी कृष्णावर नितांत श्रद्धा आहे. मी दररोज कृष्णाची भक्तीभावाने आराधना करते. हे गाणं चित्रीत करताना मला खूप मज्जा आली. मला खूप सुंदर कमेंट्स येत आहेत हे पाहून अस वाटतंय प्रेक्षकांना हे गाणं आवडत आहे. माझ्यावर प्रेक्षकांचे असेच प्रेम कायम राहो हीच सदिच्छा!”