'ऐकावं ते नवंलच...', 'कांगूवा'मधील 'या' गाण्यात दिशा पाटनीने बदलले २१ वेळा कपडे; स्वत:च केला खुलासा
साऊथ सुपरस्टार सूर्या (Suriya)आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol)यांचा बहुप्रतिक्षित ‘कांगुवा’ (Kanguva) चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची पोहोचवली आहे. येत्या १४ नोव्हेंबरला चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सूर्या, बॉबी देओल आणि दिशा पाटनीसह तगडी स्टारकास्ट मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्री दिशा पाटनीने प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत शुटिंग दरम्यानचा किस्सा शेअर केला आहे. एका गाण्याच्या शुटिंगवेळी तिने ४ दिवसांत २१ वेळा कपडे बदलल्याचे तिने सांगितले.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दिशाने सांगितलं की, चित्रपटातील योलो गाण्याच्या शुटिंगवेळी आम्हाला खूप मज्जा आली. मी त्या गाण्यात अभिनेता सूर्यासोबत काम केले आहे. चाहत्यांना हे गाणं प्रचंड आवडलं असून गाण्याला फॅन्स भरघोस प्रतिसाद देत आहेत. गाण्याच्या शुटिंगवेळी मी २१ वेळा कपडे बदलले आहेत. त्या गाण्याची शुटिंग ४ दिवस चालली होती. त्याशिवाय खूप लोकेशन्सवरही आम्ही शुटिंग केली होती. दिशाने सूर्यासोबत काम करण्याचा तिचा अनुभवही शेअर केला. ती म्हणाली, “सूर्या एक अप्रतिम कलाकार आहे. तो एक मोस्ट एनर्जेटिक कलाकार आहे. त्याच्यासोबत डान्स करणे म्हणजे एक धमाकाच आहे.”
हे देखील वाचा- ‘पुष्पा’साठी अल्लू अर्जुन नाही तर ‘हा’ अभिनेता होता फर्स्ट चॉईस…
चित्रपटात दिशाला संधी दिल्याबद्दल दिशाने दिग्दर्शक शिवाचे आभारही मानले. ‘कल्की’ आणि ‘कांगुवा’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचेही ती म्हणाली. या लार्जर दॅन लाईफ वर्ल्डचा एक भाग बनून मी आनंदी आहे. “आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दोन्ही चित्रपटांची नाव के ने सुरू होते. हे अक्षर माझ्यासाठी खरंच भाग्यवान आहे.” ‘कांगुवा’ येत्या १४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सूर्या मुख्य भूमिकेत असून तो दुहेरी भूमिका साकारणार आहे. एक पात्र शंभर वर्षे जुने आहे आणि दुसरे आधुनिक आहे. चित्रपटात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास 350 कोटीचं आहे.