'पुष्पा'साठी अल्लू अर्जुन नाही तर 'हा' अभिनेता होता फर्स्ट चॉईस...
येत्या १५ नोव्हेंबरला ‘पुष्पा २: द रूल’चा ट्रेलर रिलीज होणार आहे. ५ डिसेंबरला हा चित्रपट जगभरात रिलीज केला जाणार आहे. ‘पुष्पा’ प्रमाणेच किंवा त्याहूनही सर्वाधिक प्रतिसाद ‘पुष्पा २’ला मिळणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फाजिल अशी तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा असताना अशातच ‘पुष्पा’ चित्रपटासाठी दिग्दर्शक सुकुमार यांची चॉईस अभिनेता अल्लू अर्जुन नव्हता.
हे देखील वाचा- बिग बॉसच्या घरात टाइम गॉड बनण्याच्या शर्यतीत हे तीन स्पर्धक, विवियनच्या ग्रुपवर संकट
‘पुष्पा द राईज’ला जगभरात जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने जगभरात ३६० कोटी ते ३९४ कोटींची कमाई केलेली आहे. आता यापेक्षाही जास्त कमाई ‘पुष्पा २: द रूल’ करणार अशी अपेक्षा चित्रपटाच्या टीमसह प्रेक्षकांनाही आहे. आपसुकच आपण पुष्पाचं नाव घेतलं की, आपल्या नजरेसमोर अल्लू अर्जुनच येतो. पण असं असलं तरीही दिग्दर्शक सुकुमार यांची ‘पुष्पा द राईज’मध्ये अल्लू अर्जुन हा फर्स्ट चॉईस नव्हता. सुकुमार ह्यांनी पुष्पा चित्रपटाची ऑफर आधी दुसऱ्या तेलगू अभिनेत्याला दिली होती. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तेलुगू सुपरस्टार महेश बाबू होता. त्याच्या नकारानंतर, अल्लू अर्जुनच्या खात्यात ‘पुष्पा’ चित्रपट आला.
हे देखील वाचा- प्राइम व्हिडिओने “वॉक गर्ल्स” या ओरिजिनल ड्रामाच्या वर्ल्डवाइड प्रीमियरची केली घोषणा!
जेव्हा दिग्दर्शक सुकुमार ‘पुष्पा’ चित्रपटाची स्टोरी तयार करत होते, त्यावेळी ते सर्वात पहिले तेलुगू सुपरस्टार महेश बाबूकडे गेले होते. त्याला दिग्दर्शकांनी चित्रपटाची सर्वात पहिली ऑफर दिली होती. महेशने दिग्दर्शकाला चित्रपटाबद्दल होकारही दर्शवला होता. पण काही दिवसांनंतर, महेशमध्ये आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्यात काही मुद्द्यावरून मतभेद झाले. त्यामुळे महेश बाबू चित्रपटातून बाहेर पडले. यानंतर सुकुमार अल्लू अर्जुनकडे चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन गेले होते आणि त्याचे नशीब असे बदलले की आज तो महेश बाबूपेक्षा मोठा स्टार झाला आहे. अल्लू अर्जुन आणि महेश बाबू यांच्यात दोघांमध्येही स्पर्धा आहे. दोघांनीही एकमेकांबद्दल केव्हाच एक शब्दही बोलले नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध नाहीत. अल्लू अर्जुन आणि महेश बाबू यांचे फॅन्स सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांसोबत आपआपसात भांडताना दिसतात. याचं कारण अस्पष्ट आहे. अल्लू अर्जुन येत्या ५ डिसेंबरपासून बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा तयार करण्यासाठी सज्ज होत आहे. यासोबतच महेश बाबूही राजामौली यांच्यासोबत SSMB29 नावाचा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचं बजेट १००० कोटींच्या आसपासचं असून राजामौली या चित्रपटाला पॅनवर्ल्ड करण्याची शक्यता आहे. यासाठी ते परदेशातल्या थिएटर्स मालकांसोबतही बातचीत करीत आहेत.