Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पिझ्झा नव्हे भाकरी खा’, आशा भोसलेंनी दिल्या फिटनेससाठी खास टीप्स

अनेक लहान मुलं तुमचं पाहून खायला शिकतात. जर तुम्ही त्याच्यासमोर पिझ्झा खाल्ला तर ती लहान मुलं देखील ते खाणार. तुम्ही भाकरी का खात नाही ? असा सवाल गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांनी पालकांना विचारला आहे.

  • By साधना
Updated On: May 23, 2022 | 06:10 PM
asha bhosale

asha bhosale

Follow Us
Close
Follow Us:

गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांच्या सुंदर आवाजाचे अनेक चाहते आहेत. त्यांचा उत्साह तर वाखाणण्याजोगा आहे. आशा भोसले यांनी मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या. तसेच त्यांनी काही फिटनेस टिप्सही (Fitness Tips) दिल्या आहेत.

[read_also content=”जेवणानंतर बडीशेप आणि साखर खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/lifestyle/benefits-od-eating-saunf-and-sugar-after-meal-nrsr-283762.html”]

“अनेक लहान मुलं तुमचं पाहून खायला शिकतात. जर तुम्ही त्याच्यासमोर पिझ्झा खाल्ला तर ती लहान मुलं देखील ते खाणार. तुम्ही भाकरी का खात नाही ? माझी आई आम्हाला अनेकदा सांगायची पाच इंद्रियांना सांभाळण्यापेक्षा एका इंद्रियाला सांभाळा ते म्हणजे जीभ. तुमचं खाणं जितकं चांगलं असेल तितके तुम्ही सुंदर दिसाल”, असे त्या म्हणाल्या.

मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आशा भोसले म्हणाल्या, “मी बालपणी जास्त जाड नव्हते. पण फार गोड होते. त्यावेळी दीदी मला कडेवर घेऊन जायच्या. तिला मी फार आवडायची. पण त्यानंतर काही वर्षांनी मी जाड झाली आणि तो जाडपणा बरेच वर्ष राहिला. त्यावेळी उंचीच्या मानानं वजन जास्त झालं होतं. ते वजन कमी करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले. मला त्यावेळी काही खाल्लं तर गाणी गाता येत नव्हती. मी चार- पाच गाणी दिवसातून गायचे.”

“पण मी वयाच्या ६० व्या वर्षापासून माझं वजन ६५ किलो ठेवलं आहे. आतापर्यंत ते तेवढंच आहे. मी जेव्हा अमेरिकेत होते तेव्हा मी काही बायका रडत असल्याचे पाहिले. मी सहजच पुढे जाऊन बघितलं तर तेव्हा मला त्यांच्या रडण्याचे कारण समजले. त्यांची मुलं ही फार जाड होती. त्यांना चालताही येत नव्हते.” असेही त्यांनी म्हटले.

“यानंतर मी तातडीने माझ्या सूनेला फोन केला आणि तिला सांगितलं की, माझ्या नातवाला पाकिटातील बंद काही खायला देऊ नको. त्याला फक्त घरातील वरण भात, पोळी दे. लहान मुलांचे सोडा आपण सर्वच जाड आहोत. सर्वांनी चालायला हवं. स्वत:साठी थोडा वेळ काढायला हवा”, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Dont eat pizza eat roti asha bhosale shared fitness tips nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2022 | 06:06 PM

Topics:  

  • Asha Bhosale
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Climate Week 2026: मोठी घोषणा! भारत फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘मुंबई क्लायमेट वीक’चे यजमानपद भूषवणार
1

Mumbai Climate Week 2026: मोठी घोषणा! भारत फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘मुंबई क्लायमेट वीक’चे यजमानपद भूषवणार

Devendra Fadnavis : फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन, मुख्यमंत्र्यांची घोषणा
2

Devendra Fadnavis : फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Mumbai: मुंबईत ६ अफगाण नागरिक गजाआड! पोलिसांनी केली अटक; बनावट कागदपत्रे जप्त
3

Mumbai: मुंबईत ६ अफगाण नागरिक गजाआड! पोलिसांनी केली अटक; बनावट कागदपत्रे जप्त

Neral News : नेरळमधील व्यापारी संकुल लवकरच खुले होणार, १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा
4

Neral News : नेरळमधील व्यापारी संकुल लवकरच खुले होणार, १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.