Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas Shortage: गॅसटंचाईचा डबेवाल्यांना फटका, मेन्यू कमी करण्याची नामुश्की, तर अनेकांचे व्यवसाय बंद

सिलिंडरअभावी शहरातील विविध भागांतील किचन चालकांना आपल्या कामकाजात बदल करणे, मेनू कमी करणे, दर वाढवणे किंवा काही लोकांना व्यवसाय बंद करणे भाग पडत आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 24, 2026 | 11:41 AM
गॅसटंचाईचा डबेवाल्यांना फटका, मेन्यू कमी करण्याची नामुश्की, तर अनेकांचे व्यवसाय बंद (फोटो सौजन्य-ChatGPT)

गॅसटंचाईचा डबेवाल्यांना फटका, मेन्यू कमी करण्याची नामुश्की, तर अनेकांचे व्यवसाय बंद (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • गॅसटंचाईचा मुंबई डबेवाल्यांना फटका
  • मेन्यू कमी करण्याची नामुश्की
  • तर अनेकांचे व्यवसाय बंद
मुंबई: शहराला अन्न पुरवणारी, घरपोच जेवणाची एक मोठी आणि विकेंद्रित व्यवस्था असलेली मुंबईची मजबूत टिफिन सेवा हळूहळू गॅसटंचाईमुळे अडचणीत येत आहे. अलीकडील एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याने ही संपूर्ण व्यवस्था हादरली आहे.

सिलिंडरअभावी शहरातील विविध भागांतील किचन चालकांना आपल्या कामकाजात बदल करणे, मेनू कमी करणे, दर वाढवणे किंवा काही लोकांना व्यवसाय बंद करणे भाग पडत आहे. जोगेश्वरीतील लक्ष्मी टिफिन सर्व्हिसला आठवड्याच्या मध्यात दुसरा सिलिंडर संपल्याने व्यवसाय बंद करावा लागला, याबाबत ३० वर्षीय आकाश अधिवंद यांनी सांगितले की, ‘मी रिफिल मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तो मिळू शकला नाही. गॅस एजन्सीकडूनही स्पष्ट माहित्ती मिळत नाही.’ ते दररोज सुमारे ७० लोकांना १०० रुपये प्रति बॉक्स दराने जेवण पुरवत असत, असे त्यांनी सांगितले.

Mumbai Pune Expressway: काय सांगता! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी, पण ‘हे’ पत्र ठरणार अनिवार्य

  • ९२० रुपयांवरून सिलिंडरची किंमत २५००-३००० रुपयांपर्यंत वाढली
  • १३६ मच्छीमार सहकारी संस्खामार्फत अंदाजे ७,५५० यांत्रिकी बोटी कार्यरत आहेत
  • ७०% क्लाउड किचन कॉर्पोरिट किचन बंद झाली आहे.
  • 120 रुपयांना जे जेवण पूर्वी मिळायचे ते आता 135 रुपयांना मिळते

टिफीन सेवेच्या खर्चात मोठी वाढ

वरळी कोळीवाडा येथील नितीन मोरगावकर (४२) यांच्या ‘आयशा डब्बा’ या टिफिन सेवेमध्ये खर्चात मोठी वाढ झाली आहे. १४ किलोच्या सिलिंडरची किंमत ९२० रुपयांवरून २५००-३००० रुपयांपर्यंत वाढली आहे. जे जेवण पूर्वी १२० रुपयांना मिळायचे, ते आता १३५ रुपयांना मिळत आणि डिलिव्हरीसह १७५ रुपये खर्च येतो. नफ्यात जवळपास ३० टक्क्यांची घट झाली आहे. त्यांचे पोळी पुरवठा युनिट, जिथे पाच महिला रोज २००० चपात्या बनवत असत, ते बंद झाले आहे, ‘त्या महिलांनी नोकरी गमावली याचे मला दुःख आहे,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे शहरातील ६० ते ७० टक्के क्लाउड किचन आणि कॉपोरेट किचन बंद झाली आहेत. रोजच्या डिलिव्हरी कमी होत असून, परिणामी उत्पन्नातही घट झाली आहे. आम्ही अनेक किचनना कोळसा किंवा विजेवर चालण्याचा सल्ला देत आहोत, अशी प्रतिक्रिया डबेवाला प्रवक्ता विष्णू कालडोके यांनी दिली.

जेवण बनविण्यासाठी लाकूड, कोळशाचा आधार

साकीनाका येथील चिराग पुरोहित (३३) जुन्या पद्धतींकडे परतले आहेत. एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेमुळे, २००९ पासून ‘यम्मी टिफिन्स’ चालवणारे पुरोहित आता लाकूड आणि कोळशाच्या चुलीवर स्वयंपाक करत आहेत. पोळी आणि भाज्यांसोबतच, आम्ही उच्च-प्रधिनयुक्त राईस बाऊल्ससुद्धा बनवायची, पण आता आम्हाला ते बंद करावे लागले आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या ऑर्डर्स ५०० बॉक्सवरून सुमारे ३०० पर्यंत घसरल्या आहेत. ‘चुलीवर स्वयंपाक करायला जास्त वेळ लागतो.’ त्याच्या केटरिंग व्यवसायावरही परिणाम झाला आहे, कारण लाकूड किंवा कोळशावर चायनीज पदार्थ किंवा तळलेले पदार्थ बनवणे शक्य होत नाही, असे ते म्हणले.

मच्छीमारही आर्थिक संकटात

वाढत्या डिझेलच्या किमतीमुळे राज्यातील मच्छीमार सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांना पत्र लिहून परिस्थितीची माहिती दिली आहे आणि मदत उपाययोजनांची विनंती केली आहे. राज्यात १३६ मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत अंदाजे ७,५५० यांत्रिकी बोटी कार्यरत आहेत, ज्यांना डिझेलचा कोटा वाटप केला जातो. मात्र डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतीमुळे मच्छीमाराचे आर्थिक गणित बिघडल्याचे त्यांना दिलासा देण्याची अपेक्षा राणे यांनी व्यकात केली आहे.

Education News : “पूर्व प्राथमिक शाळांना शासन मान्यता अनिवार्य करा”, कायदा तयार करण्याची राज्य शिक्षक परिषदेची मागणी

Web Title: Gas shortage hits mumbai box carriers reduction of menu is impossible and many businesses shut down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • LPG Shortage
  • Mumbai

संबंधित बातम्या

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर
1

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची
2

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’
3

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…
4

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.