Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Pune Expressway: काय सांगता! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी, पण ‘हे’ पत्र ठरणार अनिवार्य

लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सलग तीन दिवस टोल माफी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 23, 2026 | 08:48 PM
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी (Photo Credit- X)

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • काय सांगता!
  • मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी
  • पण ‘हे’ पत्र ठरणार अनिवार्य
Mumbai Pune Expressway Toll Free News: आगरी-कोळी बांधवांची कुलदेवता असलेल्या लोणावळ्यातील कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा वार्षिक यात्रोत्सव उद्यापासून मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या यात्रेनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सलग तीन दिवस टोल माफी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

24 एप्रिलपासून यात्रोत्सवाचा प्रारंभ

यंदा एकविरा देवीची मुख्य यात्रा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार अशा तीन दिवसांच्या कालावधीत संपन्न होत आहे. 24 एप्रिलपासून या उत्सवाला सुरुवात होणार असून ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक खासगी वाहनांनी लोणावळ्याकडे रवाना होतात. या काळात टोलनाक्यांवर होणारी गर्दी आणि आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी ही विशेष सवलत देण्यात आली आहे.

देवी भक्तांसाठी आनंदाची बातमी — एकविरा आईच्या यात्रेसाठी तीन दिवस टोल माफ! pic.twitter.com/P7X4os90Pl — Balya Mama – Suresh Rekha Gopinath Mhatre (@MeBalyaMama) March 22, 2026

Mumbai Pune Missing Link: मुंबई- पुणे प्रवास होणार सुसाट! मुंबई-पुणे मिसिंग लिंक १ मे रोजी होणार खुला

टोल माफीसाठी ‘हे’ पत्र ठरणार अनिवार्य

खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सप्रेसवेवरील टोल प्रशासनाने भाविकांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला आहे. मात्र, ही टोल माफी सरसकट नसून त्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे यांचे अधिकृत टोल माफीचे पत्र सोबत असणे आवश्यक आहे. टोल नाक्यावर संबंधित वाहनचालकाने हे पत्र दाखवल्यानंतरच त्यांना शुल्कातून सवलत दिली जाईल.

वादाचे प्रसंग टाळण्यासाठी प्रशासकीय पाऊल

दरवर्षी यात्रेच्या काळात टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांशी होणारे वादाचे प्रसंग आणि लांबच लांब रांगांमुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. भाविकांच्या भावना आणि मागणी लक्षात घेऊन खासदारांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. “भाविकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि सुरक्षितरीत्या प्रवास करून देवीचे दर्शन घ्यावे,” असे आवाहन खासदार सुरेश म्हात्रे यांनी केले आहे.

आगरी-कोळी बांधवांची अलोट गर्दी होणार

लोणावळ्यातील एकविरा मंदिर हे केवळ आगरी-कोळी समाजाचेच नव्हे, तर सर्वधर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेच्या तीन दिवसांत कार्ला गडावर पालखी सोहळा, भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. टोल माफीच्या निर्णयामुळे यंदा भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Indian Railwayचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गाड्यांना ‘ब्रेक’, तर उत्तर भारतासाठी विशेष गाड्यांचा पूर

Web Title: Three day toll exemption on mumbai pune expresswaybut this letter will be mandatory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Mumbai
  • Pune

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक
1

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे
2

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
3

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

NUCFDC Headquarter : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! NUCFDC चे मुख्यालय मुंबईत होणार; अमित शाह यांची घोषणा
4

NUCFDC Headquarter : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! NUCFDC चे मुख्यालय मुंबईत होणार; अमित शाह यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.