(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
जर एखादा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच संगीताच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रिय झाला असेल, तर तो म्हणजे ‘एक दिवाने की दीवानियत’. मिलाप मिलन झवेरी दिग्दर्शित हा रोमँटिक ड्रामा चित्रपट आतापर्यंत चार सलग सुपरहिट गाणी देऊन चर्चेत आला आहे. जे एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शना अगोदर अत्यंत दुर्मिळ घडतं.
आणि या यशस्वी कहाणीच्या मध्यभागी आहेत अंशुल गर्ग, जे या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून आपला पदार्पण (डेब्यू) करत आहेत. त्यांनी आपल्या नव्या Desi Movies Factory या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.अनेकांसाठी अंशुल गर्ग हे नाव नवीन नाही. Desi Music Factory (DMF) आणि Play DMF या ब्रँड्सचे संस्थापक म्हणून त्यांनी भारतातील स्वतंत्र संगीतविश्वाला एक नवीन दिशा दिली आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांत देशाला अनेक लोकप्रिय पॉप गाणी दिली आहेत. सूर आणि मेलडी ओळखण्याची त्यांची क्षमता, तसेच नव्या टॅलेंटला संधी देण्याची त्यांची दृष्टी, यामुळे ते संगीतविश्वातील एक महत्त्वाचे नाव बनले आहेत. आता त्यांनी संगीताच्या दुनियेतून सिनेमाकडे वाटचाल केली असून त्यांचा पहिला चित्रपट आधीच एक म्युझिकल ब्लॉकबस्टर ठरत आहे.
चित्रपटाच्या साउंडट्रॅकची सुरुवात झाली त्याच्या टायटल ट्रॅक “दीवानियत” पासून, ज्याला विशाल मिश्रा यांनी आवाज दिला आहे. या गाण्याची मोहक धून आणि हृदयस्पर्शी बोलांनी ते लोकांच्या मनात लगेच घर करून बसले. या गाण्याने चित्रपटाचा मूड सेट केला. एक अशी कथा जी प्रेम, वेड आणि उत्कटतेने भरलेली आहे, आणि ज्याला संगीताने अधिक भावनिक गती दिली आहे.
प्रेक्षकांची उत्सुकता चौथ्या गाण्यासाठी, “दिल दिल दिल”, शिगेला पोहोचली आहे, जे उद्या रिलीज होत आहे. हे गाणं सुनिधी चौहान आणि संदीप जहां यांनी गायले आहे, बोल सिद्धांत कौशल यांनी लिहिले आहेत आणि संगीत अनु मलिक यांनी दिले आहे. हे गाणं जोश, रोमँस आणि सिनेमॅटिक ऊर्जा यांचा अप्रतिम संगम ठरणार आहे.आणि निश्चितच या अल्बमला आणखी उंचीवर नेईल.
अंशुल गर्ग यांनी निर्मित आणि राघव शर्मा यांनी सह-निर्मित केलेल्या या चित्रपटात हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं संगीत सध्या संपूर्ण इंडस्ट्रीत चर्चेचा विषय बनलं आहे. कारण याने पुन्हा त्या जुन्या बॉलिवूड परंपरेला जिवंत केलं आहे, जिथे संगीतच कथानक आणि भावना पुढे नेतं.
हार्दिक पांड्याच्या पोस्टनंतर आता गर्लफ्रेंड माहिका शर्मा देणार गुड न्यूज, म्हणाली…
‘एक दिवाने की दीवानियत’ द्वारे त्यांनी केवळ चित्रपटसृष्टीत प्रवेश केला नाही, तर हेही दाखवून दिलं आहे की संगीतावर आधारित कथा आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवू शकतात.
या दिवाळीत, 21 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होणारा ‘एक दिवाने की दीवानियत’ हा या वर्षातील सर्वात चर्चित रोमँटिक चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. आणि अंशुल गर्ग यांचा हा स्वप्नवत डेब्यू आता एक संस्मरणीय म्युझिकल फिनॉमेनन ठरत आहे.