Rekha-Amitabh Bachchan Viral Video Rekha modern look Amitabh Bachchan kept looking video goes viral
बॉलीवूडमधील सर्वात सुपरहिट असलेली जोडी म्हणजे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि सौंदर्यवती रेखा. या दोघांच्या नात्याची चर्चा आजही ताजीतवाणी आहे. ही जोडी जोपर्यंत सिनेमाचे अस्तित्व आहे तोपर्यंत सदाबहार राहिल. त्यांच्या जमान्यातीसल अनेक जुने किस्से तुम्ही ऐकले असतील. जुने किस्से, जुने फोटो, जुने व्हिडिओ सोशल मीडियामुळे सतत चर्चेत असतात. सध्या असाच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याने मोठी धुमाकुळ घातली आहे.
या व्हिडिओमध्ये रेखा जी एकदम हटके, मॉडर्न लुकमध्ये दिसत असून बिग बी त्यांच्याकडे पाहातच राहिले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक पुरस्कार सोहळा सुरु आहे. यावेळी रेखा जी पुरस्कार घोषित करण्यासाठी स्टेजवर येतात. तुम्ही पाहू शकता की त्यांनी एकदम मॉडर्न लुक केला आहे. पांढरा शर्ट आणि त्यावर ब्लॅक ब्लेझर, ब्लॅक पॅंन्ट परिधान केले आहेत. तसेच केसांची पोनी टेल बांधली आहे.
तर बिग बी ब्लॅक सूटमध्ये एकदम डॅशिंग दिसत आहेत. दोघांचाही अंदाज अगदी थक्क करणारा आहे. या वेळी रेखा जी स्टेजवर येताना बिग बी त्यांच्याकडे पाहातच राहिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. बिग बींचे हावभाव लक्ष वेधून घेणारे आहेत. व्हिडित जया बच्चनही दिसत आहे. तर इतर अनेक कलाकारही सोहळ्यासाठी उपस्थित दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @kamaalrkhan या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अभिनेता कमाल आर खान यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेकांनी विविध अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतेय अमिताभ यांच्या नजरेजत रेखा दिसतेय, तर कोणी म्हणतेय त्यांचा लुक खूप स्टाईलिश आहे. कोणी जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या ल्गनावर टिका करत आहे. अशा अनेक विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.