
धनुष आणि मृणाल ठाकूर यांनी केले लग्न? Viral Video मागील नेमकं सत्य काय?
बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेली मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी मृणाल आणि सुपरस्टार धनुष डेट करत असल्याची चर्चा होती. पुन्हा एकदा या चर्चेनं डोकं वर काढलं आहे. यावेळी, हे फक्त अफेअर नाही तर मृणाल आणि धनुष यांनी लग्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय सत्य आहे? जाणून घेऊया…
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात धनुष आणि मृणाल यांच्या नात्याबद्दल चर्चा होती. आता ही चर्चा लग्नापर्यंत पोहोचली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये धनुष आणि मृणाल ठाकूर लग्न करत असल्याचे दिसत आहे. हा एक दक्षिण भारतीय लग्न आहे, ज्यामध्ये थलापती विजय, अजित कुमार, त्रिशा आणि श्रुती हासन सारखे अनेक कलाकार उपस्थित होते. धनुष आणि मृणाल यांनी खरोखरच लग्न केले होते का?
धनुष आणि मृणाल ठाकूर डेटिंग करत आहेत आणि काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अफवांनी धुमाकूळ घातला होता की, हे जोडपे १४ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्न करणार आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धनुष आणि मृणाल दक्षिण भारतीय पद्धतीने लग्न करताना दिसत आहेत. धनुष आणि मृणालच्या लग्नाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
धनुष आणि मृणालच्या लग्नाला त्रिशा, श्रुती हासन, अनिरुद्ध रविचंदर, अजित कुमार, दुल्कर सलमान आणि थलापती विजय सारखे सेलिब्रिटी उपस्थित होते. जरी हा खऱ्या लग्नाचा व्हिडिओ वाटत असला तरी, सत्य हे आहे की हा एआय-जनरेटेड व्हिडिओ आहे. व्हायरल होत असलेल्या मृणाल ठाकूर आणि धनुषच्या एआय लग्नाच्या व्हिडिओवर नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत, वेगवेगळ्या नेटिझन्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका नेटिझन्सने टिप्पणी केली, “छान एआय काम… अजित या तारखेला दुबईमध्ये होता.” दुसऱ्या एका इन्स्टाग्राम युजर्सने लिहिले, “लग्न ठीक आहे, यार… बघा विजय अजित सर्व गोष्टींमागे कसा उभा आहे.” दुसऱ्या एका नेटिझन्सने टिप्पणी केली, “धनुष स्वतःला धक्का बसला आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, “मृणाल पुढच्या महिन्यात लग्न करणार नाहीये. ही एक अफवा पसरली आहे.” तिचा फेब्रुवारीमध्ये एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. ती लग्न का करेल? आणि त्यानंतर तिचा आणखी एक तेलुगु चित्रपट मार्चमध्ये रिलीज होणार आहे.
मृणालकडे “दो दिवाने सहर में,” “डकैत: एक प्रेम कथा,” “है जवानी तो इश्क होना है,” आणि “पूजा मेरी जान” सारखे अनेक मनोरंजक चित्रपट आहेत. दरम्यान, धनुष लवकरच विघ्नेश राजा दिग्दर्शित ‘कारा’ या चित्रपटात दिसणार आहे.