Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढदिवशी विशाखा सुभेदारला मिळालं खास सरप्राईज; पोस्ट लिहित म्हणाली, “गेल्या अनेक वर्षात…”

विशाखा सुभेदार सध्या ‘The दमयंती दामले’ नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकाच्या प्रयोगावेळी रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत अभिनेत्री विशाखा सुभेदारचा नाटकाच्या टीमकडून वाढदिवस साजरा करण्यात आला.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 23, 2025 | 08:47 PM
"इंग्रजी मीडियममध्ये मुलांना घाला, पण संस्कार..." हिंदी भाषेच्या सक्तीवर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट; पालकांना केलं 'हे' आवाहन

"इंग्रजी मीडियममध्ये मुलांना घाला, पण संस्कार..." हिंदी भाषेच्या सक्तीवर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट; पालकांना केलं 'हे' आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडीच्या माध्यमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार चर्चेत आली आहे. तिने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिका, चित्रपट, नाटकात ती वेगवेगळ्या भूमिका साकारत आहे. सध्या तिचं या तिन्हीही माध्यमांमध्ये जोरदार काम सुरू आहे. अशा या दमदार अभिनेत्रीचा काल म्हणजेच २२ मार्चला वाढदिवस होता. त्यानिमित्त मराठी इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकार मंडळींसह तिच्या चाहत्यांनीही तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा खास दिवस विशाखा सुभेदारने कशा पद्धतीने साजरा केला? यासंदर्भात तिने नुकतीच इन्स्टाग्रामवर भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.

‘हा’ पुरस्कार स्टार प्रवाहच्या अवॉर्ड पेक्षाही मौल्यवान! ‘ठरलं तर मग’च्या सायलीला चाहत्यांकडून मिळाला खास पुरस्कार

विशाखा सुभेदार सध्या ‘The दमयंती दामले’ नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकाच्या प्रयोगावेळी रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत अभिनेत्री विशाखा सुभेदारचा नाटकाच्या टीमकडून वाढदिवस साजरा करण्यात आला. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर करत तिने भली मोठी पोस्ट लिहिली आहे. विशाखाने लिहिलं, “गेल्या अनेक वर्षात असा वाढदिवस झाला नाही. सुरुवात रात्री माझ्या लंडनला असणाऱ्या लेकानं केली. माझ्यासाठी केक पाठवला, मग रात्री तो आम्ही कापला आणि गप्पा मारत मारत त्यावर मी ताव मारला एकटीनंच. खरंतर मी माझ्या लेकाला खूप मिस करत होते. तो माझ्यापासून लांब आहे. आणि मग सकाळ झाली अनेक जणांचे फोन येत होते. दादा, वहिनी, भाचे, जावा, नंदा, दिर, माझ्या घरच्या अन्नपूर्णा, काहींचे फोन घेता आले, तर काही रिसिव्ह नाही करता आले. मग सकाळी माझा नवरा आला. एक सोन्याचं ब्रेसलेट मला गिफ्ट केलं. मज्जाच वाटली मला, खूप जास्त. चक्क त्यांनी मला सरप्राइज दिलं. नाहीतर एरवी काय गिफ्ट घ्यायचं, काय नाही ते सगळं अगदी मला विचारून, मग त्यासाठी पैसे ठेवून, मग ते घेणार. पण यावेळी माझ्या नवऱ्याने सिक्सरच मारला आणि मग त्यानंतर आई घरी आली. तिच्या पाया पडले. औक्षण झालं. माझ्या बाबांचा बॉटल ग्रीन हा आवडता रंग, म्हणून मग त्यांच्या आवडीच्या रंगाचे कपडे घातले. आणि मग निघाले दीनानाथच्या प्रयोगाला.”

 

“प्रयोगाला सगळ्या नाटकाच्या मंडळींनी खूप छान स्वागत केलं. सगळ्यांनी विश केलं आणि छान प्रेक्षकांच्या सानिध्यात माझा वाढदिवस साजरा झाला. नाटक छान रंगलं. प्रेक्षक सुंदर दाद देत होते. अनेक लोकांनी खूप काय काय गिफ्ट्स आणले होते. खाण्याच्या गोष्टी, काही चॉकलेट, काही वड्या, मँगो बर्फी आणि सगळ्यात जास्त म्हणजे गजरे. मोगऱ्याचे गजरे आणि चाफा… इतका सुगंधी झाला माझा वाढदिवस काल… आणि मग त्यानंतर माझी अतिशय जवळची मैत्रीण अर्चना तिचा नवरा म्हणजे मनजीत, पंढरीनाथ कांबळे, आद्या, ग्रीष्मा, अनिता कांबळे आणि आमचं पिल्लू अस्मि. तिथेच पुष्कर श्रोत्री, अमित राज, क्षितिज पटवर्धन ही मंडळी सुद्धा होती. ते सुद्धा विश करायला आले. गप्पा झाल्या…आम्ही हॉटेलमध्ये मस्त जेवणावर ताव मारला. माझ्या नवऱ्याचा सुद्धा नाटकाचा प्रयोग होता, म्हणून तो बिचारा येऊ शकला नाही. आणि माझा लेक लंडनला. त्या दोघांना मी खूप मिस केलं,”

Sikandar Official Trailer: ‘सिकंदर’चा ॲक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज, भाईजानने ३ मिनिटे ३७ सेकंदात सर्वांचेच मन जिंकले…

पुढे विशाखा सुभेदारने लिहिलं, “ग्रीन हाऊस… पार्ले. खूपच चविष्ट जेवण होतं. इथे हॉटेलवाल्यांनी माझ्यासाठी केक अरेंज केला. स्वतः मालक, मालकीण, मुलं, त्यांच्या सूनबाई सगळे माझा वाढदिवस साजरा करायला, मला भेटायला आले. त्यांच्याबरोबर मग केक कापला. त्यांनी हॉटेलमध्ये हॅपी बर्थडेचं गाणं लावलं…आणि त्यांनी मला ट्रीट दिली. त्यांनी माझं बिलच माफ करून टाकलं. इतका सोन्यासारखा वाढदिवस काल झाला माझा, की क्या कहना…प्रेक्षकांच्या सानिध्यात, हशा आणि टाळ्यांच्या आवाजात, मित्र-मैत्रिणींच्या प्रेमात, खूपच कमाल दिवस गेला. मला फेसबूकवर, इन्स्टाग्रामवर ज्या ज्या मंडळींनी, ज्या ज्या रसिक प्रेक्षकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्या सगळ्या मंडळींचे मनापासून आभार! आम्ही कलाकार खरंच खूप भाग्यवान असतो. आयुष्यभराचा आनंद रसिकांच्या प्रेमामुळे आमच्या आयुष्यात आलेला असतो. सगळ्यांचे पुन्हा मनापासून आभार! आणि सगळ्यात शेवटी ज्या परमेश्वराने मला हा दिवस दाखवला, त्या माझ्या देवाचे सुद्धा मनापासून आभार,” असं विशाखा सुभेदारने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Web Title: Famous marathi actress vishakha subhedar husband and son gave her a special gift on her birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 08:47 PM

Topics:  

  • marathi actress
  • Television Actress
  • Vishakha Subhedar

संबंधित बातम्या

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…
1

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर
2

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर

फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे” 
3

फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे” 

भाडिपाचा सारंग, फुलपाखरू ऋता एकत्र! ‘आली मोठी शहाणी’ सिनेमाची घोषणा…
4

भाडिपाचा सारंग, फुलपाखरू ऋता एकत्र! ‘आली मोठी शहाणी’ सिनेमाची घोषणा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.