tharla tar mag fame jui gadkari receives special award from fans shares post
टेलिव्हिजनच्या दुनियेत टीआरपीच्या शर्यतीत सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका अव्वल आहे. पण टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असलेल्या ह्या मालिकेला गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ मध्ये फार काही जास्त पुरस्कार मिळाले नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणाऱ्या ह्या मालिकेला ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’या सोहळ्यात ‘ठरलं तर मग’ला ‘सर्वोत्कृष्ट महामालिका प्रेक्षक पसंती’हा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय आणखी एक पुरस्कार अभिनेत्री जुई गडकरी हिला मिळाला आहे. तिला पुरस्कार मिळाल्यानंतर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार जिंकलेल्या मालिकेला मालिकेतील मुख्य जोडीला या सोहळ्यात एकही पुरस्कार मिळाला नव्हता. आता जुई गडकरीला खास पुरस्कार मिळाला आहे. पण तो तिला मुख्य सोहळ्यात मिळालेला नाही. तर तिला हा खास पुरस्कार मालिकेच्या सेटवर मिळालेला आहे. ‘स्टार प्रवाह’चा पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर ‘ठरलं तर मग’मालिकेच्या चाहत्यांनी याबद्दल कमेंट्स सेक्शनमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘टीआरपीमध्ये टॉपवर असलेल्या मालिकेतील मुख्य कलाकारांना एक तरी अवॉर्ड मिळायला हवा होता,’अशा कमेंट्स ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर नेटकऱ्यांनी केल्या होत्या. आता मालिकेतल्या मुख्य अभिनेत्रीला एकदम स्पेशल अवॉर्ड मिळाला आहे.
Jui Gadkari News
अश्लील मेसेजेस, जिवंत जाळण्याची धमकी; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! FIR दाखल
मुख्य सोहळ्यात एकही पुरस्कार मिळाला नसला, तरी सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीला एक खास पुरस्कार मिळाला आहे. जुईसाठी तिच्या चाहत्यांनी खास ट्रॉफी डिझाईन केलीये. हा पुरस्कार घेऊन अभिनेत्रीचे चाहते थेट ‘ठरलं तर मग’मालिकेच्या सेटवर पोहोचले होते. या ट्रॉफीवर ‘जुई गडकरी- लाडकी लेक (क्वीन ऑफ हार्ट्स)’असं लिहिण्यात आलं आहे. याचा फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जुई गडकरीने लिहिलंय की, “प्रत्येक ट्रॉफी ही लाखमोलाची असते पण, ही जरा जास्तच खास आहे कारण, ही ट्रॉफी माझ्या कायम हृदयाजवळ राहणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या चाहत्यांचे व हितचिंतकांचे खूप खूप आभार. तुम्ही सेटवर येऊन आमची प्रशंसा केली, ट्रॉफी दिली, आमच्यासाठी गिफ्ट्स आणि गोड पदार्थ आणले… मी खरंच तुमची कृतज्ञ आहे. मुलींनो तुमचे खूप खूप आभार… तुम्ही मला ‘क्वीन ऑफ हार्ट्स’म्हटलं याचा अभिमान आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ‘क्वीन ऑफ हार्ट्स’असेन तर, तुम्ही सगळ्या ‘हॉर्ट ऑफ गोल्ड’ आहात.”
दरम्यान, जुई गडकरीने तिच्या चाहत्यांना या पोस्टमध्ये टॅग देखील केलं आहे. चाहत्यांनी दिलेला पुरस्कार, चॉकलेट्स या सगळ्याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
Jui Gadkari News