Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडिया एन्फ्लुएंसर ते प्रसिद्ध अभिनेता, अक्षय आठरेचा प्रेरणादायी प्रवास युवकांसाठी ठरतोय आयडॉल

पुस्तकी ज्ञान घेऊन नोकरी करणे म्हणजेच करिअर असते. पण याला अपवाद ठरतोय छत्रपती संभाजीनगरातील एक पठ्ठ्या... नोकरी न करता व्यवसाय करण्याची इच्छा ठेवली आणि सोशल मीडियाने त्याचं अख्खं आयुष्यच बदललं.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 26, 2024 | 07:11 PM
सोशल मीडिया एन्फ्लुएंसर ते प्रसिद्ध अभिनेता, अक्षय आठरेचा प्रेरणादायी प्रवास युवकांसाठी ठरतोय आयडॉल

सोशल मीडिया एन्फ्लुएंसर ते प्रसिद्ध अभिनेता, अक्षय आठरेचा प्रेरणादायी प्रवास युवकांसाठी ठरतोय आयडॉल

Follow Us
Close
Follow Us:

पुस्तकी ज्ञान घेऊन नोकरी करणे म्हणजेच करिअर असते. याला अपवाद ठरतोय सिडकोत राहणारा मेकॅनिकल इंजिनिअरचे शिक्षण घेतलेला अक्षय आठरे. नोकरी न करता व्यवसाय करण्याची इच्छा ठेवली. परंतु सोशल मीडीयावर सहजरित्या अपलोड केलेले व्हिडीओने त्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहचवले. अक्षयच्या इंस्टाग्रामवर ७ लाख ६३ हजार फालोअर्स असून पूर्णवेळ करिअर म्हणून तो काम करतोय. एवढेच नाही तर युवकांसाठी आयडॉल सुद्धा ठरतोय. त्याने ‘माझा भाऊराया’, ‘साज तुझा’, ‘फितूर’, ‘जीव नादावला’ अश्या अनेक म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे.

प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या अक्षय आठरे याचे शालेय शिक्षण बळीराम पाटील विद्यालयात झाले. वडिल कंपनीत कामगार तर आई गृहिणी आहे. अशा कुटूंबात राहून त्याने एमआयटी महाविद्यालयातून मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना लाईक ॲपवर सहजरित्या मनोरंजनात्मक व्हिडीओ अपलोड केले. यात त्याच्या व्हिडीओला लाईक मिळत गेले. कधी गाण्यावर तर कधी डायलॉगवर लिप्सिंग करत केलेल्या व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळत गेला. काही काळातच टिकटॉकची क्रेझ वाढत चालली होती. यावर अक्षयने अकांऊंट उघडले अन् त्यावरही ॲक्टिंगचे व्हिडीओ टाकत. यावरही लोकांची पसंत वाढत गेली. यावेळी अक्षयने सोशल मीडिया हाच करिअरचा मार्ग निवडला.

इंजिनिअरींच्या शेवटच्या वर्षांत असताना सोशल मीडीयातून मिळालेल्या पैशातून अक्षयने चांगला आयफोन घेतला. परंतू बाहेरचे लोक टोमणे मारायचे. त्यामुळे वडिलांनासुध्दा मुलाने शिक्षण करून नोकरी करावी असे वाटायचे. मात्र आईकडून सोशल मीडियासाठी सपोर्ट मिळत गेला. एकदा वडिलांसोबत बाहेर गेल्यानंतर लोक अक्षयसोबत फोटो काढायचे. वडील बाहेर गेल्यानंतर तुम्ही अक्षयचे वडील ना..असे म्हणायचे. त्यामुळे वडिलांनासुध्दा अक्षय काहीतरी चांगले करतोय हे पटले अन् त्यांचाही सपोर्ट मिळाला.

‘बिग बॉस 9’ फेम कपल प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याने ब्लॉगमध्ये केला खुलासा!

अक्षयने सखी आणि सखा या नावाने सलूनसुध्दा उभारले. १० विविध प्रकारच्या अल्बमध्ये ॲक्टिंग केली आहे. कंटेट क्रिएटर, युटयूबर, ॲक्टर अशाप्रकारची ओळख निर्माण केली. कोणतेही क्लासेस न करता युवकांचा आयडॉल ठरत आहे. त्याचे रोमांटिक व्हिडीओ, क्यूट कपल थिंक्स व्हिडीओ आणि लिपसिंग व्हिडीओ लोकांची पसंती ठरत आहे. आज अक्षयने याच पैशावर स्वत:ची कार आणि व्यवसाय सुरू केला. आज अक्षयला विविध मालिका आणि चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा होत आहे. येणाऱ्या काळात या क्षेत्रात काम करणार असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर काम करताना हजार रुपयांची कमाई होत असताना ती लाखांवर गेली आहे. एवढेच नाहीतर विविध विषयांवर असलेले व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरत आहेत हीच यशाची खरी पावती मिळत आहे.

अपघातातून थोडक्यात बचावलेल्या कश्मीरा शाहने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, मी बरी आहे, पण नाकावरचं…”

युवकांना संबोधत अभिनेता अक्षय म्हणाला, “युवकांनी शिक्षण करावे. नोकरी, व्यवसाय करून सोशल मीडीयाकडे वळले पाहिजेत. आपल्या हातात पैसे कमविण्याचे दोन -तीन मार्ग असावेत. पूर्णवेळ सोशल मिडीयाला करिअर म्हणून पाहू नये.”

Web Title: Famous social media influencer akshay aathare tiktoker to actor inspirational story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 07:08 PM

Topics:  

  • marathi actor

संबंधित बातम्या

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
1

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर
2

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

पहिला चित्रपट अन् पहिलाच फिल्मफेअर अवॉर्ड; ‘या’ अभिनेत्याला “येक नंबर” चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार
3

पहिला चित्रपट अन् पहिलाच फिल्मफेअर अवॉर्ड; ‘या’ अभिनेत्याला “येक नंबर” चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार

“अखेर आज आमची इच्छा पूर्ण….”, संकर्षणने शेअर केला ‘त्या’ आजींसोबतचा भावूक व्हिडिओ…
4

“अखेर आज आमची इच्छा पूर्ण….”, संकर्षणने शेअर केला ‘त्या’ आजींसोबतचा भावूक व्हिडिओ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.