Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम यांना ‘मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत’ पुरस्कार जाहीर

गेली तीस वर्षांहून अधिक काळ रंगभूमीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम यांना यंदाचा 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 21, 2024 | 06:11 PM
ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम यांना 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम यांना 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

गेली तीस वर्षांहून अधिक काळ रंगभूमीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम यांना यंदाचा ‘मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत’ पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटक, मालिका, सिनेमा अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमात त्यांची अतुलनीय कामगिरी आहे. अधांतर, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, कब्बडी कब्बडी, तन-मन अशा कित्येक दमदार नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. केवळ दिग्दर्शनच नाही तर अभिनयातही त्यांनी मुशाफिरी केली. असा मी-असामी, के दिल अभी भरा नही, आमने-सामने, इवलेसे रोप अशा अनेक बहारदार कलाकृती आपल्या अभिनयाने त्यांनी लोकप्रिय केल्या आहेत.

अभिनेते नागेश भोसलेंची शॉर्टफिल्म ऑस्करच्या शर्यतीत, १८० शॉर्ट फिल्मसमधून झालीये निवड

मनोरंजन विश्वातील त्यांच्या प्रदीर्घ सक्रिय कामगिरीची दखल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीने झटणाऱ्या संस्थांपैकी अग्रणी असलेल्या “धि गोवा हिंदू असोसिएशन” या संस्थेनी घेतली आहे. या संस्थेमार्फत दिला जाणारा ‘मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत पुरस्कार’ यंदा श्री. मंगेश कदम यांना जाहीर झाला आहे. दिनांक २१ डिसेंबर,२०२४ रोजी सायंकाळी ४ .३० ते ८.३० या वेळेत प्राचार्य बी. एन.वैद्य सभागृह, सर भालचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व), मुंबई -४०० ०१४ येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

कतरिना कैफच्या सौंदर्याची सासू वीणा कौशल घेते विशेष काळजी, अशा प्रकारे सुनेला करते मदत!

विशेष बाब म्हणजे मनोरंजन विश्वातील अत्यंत बहुमानाचा मानला जाणारा हा पुरस्कार या आधी श्री. मधुकर तोरडमल, श्रीमती सुधा करमरकर, श्री. भिकू पै आंगले, डॉ. श्रीराम लागू, श्री. जयंत सावरकर, डॉ. विजया मेहता अशा दिग्गजांना मिळाला आहे. आता या सन्मान यादीमध्ये अभिनेते- दिग्दर्शक मंगेश कदम यांच्याही नावाची मोहर उमटली आहे. ‘मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत पुरस्कार’ दरवर्षी बहुआयामी कलावंतांना दिला जातो. यंदाचा, ‘२०२४’ या वर्षातील पुरस्कार श्री. मंगेश कदम यांना प्रदान करण्यात येणार आहे.

“तो आजही माझा खूप जवळचा मित्र…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम एजेबाबत एक्स पत्नीचं मोठं विधान

हा पुरस्कार जाहीर होताच मंगेश कदम यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ”धि गोवा हिंदू असोसिएशन या अत्यंत मानाच्या संस्थेकडून पुरस्कार मिळणं ही कलाकार म्हणून खूप सुखावणारी बाब आहे. कारण आपल्या कामाचे कौतुक कुणाकडून होत आहे हेही महत्वाचे असते. जेव्हा मधुकर तोरडमल, सुधा करमरकर, डॉ. लागू, जयंत सावरकर, विजयाबाई अशा दिग्गजांचा सन्मान करणारी संस्था त्या पुरस्कारासाठी आपले नाव जाहीर करते तेव्हा तो कलाकार म्हणून आमचा बहुमान असतो आणि निश्चितच जबाबदारीही वाढते. मी अत्यंत विनम्रतेने आणि जबाबदारीने हा पुरस्कार स्वीकारत आहे. तसेच पुढेही माझ्याकडून रंगभूमीची आणि रसिक मायबापांची सेवा होत राहील, अशी मी खात्री देतो.

Web Title: Famous television actor mangesh kadam will awarded with master duttaram chaturastra kalavant award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 06:11 PM

Topics:  

  • marathi actor
  • zee marathi

संबंधित बातम्या

‘Lakshmi Niwas’ मालिकेत नवा ट्विस्ट; प्रोमो पाहून प्रेक्षकांचा संताप, नेटकरी म्हणाले; “चांगली मालिका फालतू केली”
1

‘Lakshmi Niwas’ मालिकेत नवा ट्विस्ट; प्रोमो पाहून प्रेक्षकांचा संताप, नेटकरी म्हणाले; “चांगली मालिका फालतू केली”

Veen Doghatli Hi Tutena: समरच्या आरोग्यासाठी स्वानंदीने घेतला योग आणि प्राणायाम शिकवण्याचा निर्णय
2

Veen Doghatli Hi Tutena: समरच्या आरोग्यासाठी स्वानंदीने घेतला योग आणि प्राणायाम शिकवण्याचा निर्णय

Marathi Serial : अखेर वडिलांचं सत्य आलं समोर, केदारच्या आयुष्यात नवं वादळ; तारिणी मालिकेचा नवा प्रोमो
3

Marathi Serial : अखेर वडिलांचं सत्य आलं समोर, केदारच्या आयुष्यात नवं वादळ; तारिणी मालिकेचा नवा प्रोमो

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका! ८० मराठी सिनेकलाकार ‘डोंबिवलीकर चषक’मध्ये भिडणार
4

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका! ८० मराठी सिनेकलाकार ‘डोंबिवलीकर चषक’मध्ये भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.