“तो आजही माझा खूप जवळचा मित्र…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम एजेबाबत एक्स पत्नीचं मोठं विधान
‘असुर’, ‘मुंबई डायरीज २’, ‘टायगर ३’, ‘जवान’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’ अशा वेगवेगळ्या कलाकृतींमुळे अभिनेत्री रिद्धी डोगरा प्रकाशझोतात आली. रिद्धी डोगरा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं आहे. अभिनेत्रीने मराठी अभिनेता आणि टीव्ही अभिनेता राकेश बापट सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर ८ वर्षांनी त्यांचं घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही अभिनेत्रीचं राकेशसोबत मैत्री असल्याचं तिने मुलाखतीत सांगितले.
‘ओडेला 2’चे नवीन पोस्टर रिलीज; तमन्ना भाटियाच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी दिले खास सरप्राईज!
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम एजे म्हणजे अभिनेता राकेश बापटसोबत अभिनेत्री रिद्धी डोगराचं लग्न झालं आहे. रिद्धी आणि राकेशने एकमेकांसोबत २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांनीही ८ वर्षानंतर म्हणजेच २०१९ मध्ये एकमेकांसोबत घटस्फोट घेतला. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री रिद्धी डोगरा हिने एक्स पती राकेश बापटबद्दल सांगितले की, “जरीही माझा घटस्फोट झाला असला तरीही मला माहिती आहे की, जेव्हा माझ्यापाठी समस्या उद्भवतात, त्यावेळी मला कोणाच्या पाठिंब्याची गरज आहे, हे माहीत आहे. मी माझ्या मनातल्या समस्या सहसा कोणाजवळही मांडत नाही.”
पुन्हा एकदा ‘अनुपमा’ वादात, रातोरात या अभिनेत्रीचा मालिकेतून केला पत्ता कट्ट!
जर मला कोणाच्याही पाठिंब्याची गरज असेल तेव्हा माझ्या पाठीशी माझे अनेक लोकं उभे असतात. माझ्यासाठी माझा भाऊ अक्षय डोगराही कायमच माझ्या पाठीशी उभा असतो, तो माझा मोठा सपोर्ट आहे. त्याला माहिती आहे, माझा स्ट्रेस कशा पद्धतीने हाताळायचा. पण माझ्या आयुष्यात असेही काही मित्र आहेत, ज्यांच्याकडून मी स्ट्रेसमध्ये असते तेव्हा सल्ला घेते. मी जेव्हा स्ट्रेसमध्ये असते तेव्हा एकता कपूरकडे जाते. शिवाय माझे शाळेतले मित्रही मला स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी मदत करतात. इतकंच नाही तर, माझा एक्स हसबेंड राकेश बापटही मला स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी मदत करतो. आमचा जरीही घटस्फोट झाला असला तरीही मी कोणत्याही समस्येत असो तेव्हा मी त्याच्याकडून सल्ला घेतेच. तो माझा आजही खूप जवळचा मित्र आहे.”
वरूण धवन करणार विवियन आणि करणवीरवर प्रश्नांचा मारा! करणच्या उत्तरावर लाडल्याचे प्रत्युत्तर
रिद्धी डोगरा गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. नुकतीच विक्रांत मेस्सी आणि राशी खन्नासोबत ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये रिद्धी डोगरा दिसली होती. रिद्धीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकांतून केली. ‘राधा कि बेटियाँ कुछ कर दिखायेंगी’, ‘माता-पिता के चरणों में स्वर्ग’, ‘लागी तुझसे लगन’, ‘मर्यादा : लेकिन कब तक?’, ‘वो अपना सा’ या प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेंमधून प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप सोडली. सध्या रिद्धी ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने ‘असुर’, ‘मॅरिड वूमन’ अशा अनेक प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये काम केले आहे. २०२३ साली प्रदर्शित झालेल्या शाहरूख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. तिने ‘टायगर ३’मध्येही काम केले आहे. आगामी काळात रिद्धी ही फवाद खान आणि वाणी कपूरबरोबर ‘अबीर गुलाल’मध्ये दिसणार आहे.
अमिताभ बच्चन आई तेजी बच्चन यांच्या 17 व्या पुण्यतिथीनिमित्त झाले भावुक, शेअर केला सुंदर फोटो!
तर, राकेश बापटबद्दल बोलायचे तर, अभिनेता राकेश बापट ‘नवरी मिळे हिटलरला’या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिराम ऊर्फ एजे ही प्रमुख भूमिका तो साकारताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीवर टेलिकास्ट होणारी ‘नवरी मिळे हिटलरला’ ही लोकप्रिय मालिकेला ‘झी मराठी अवॅार्ड २०२४’ पुरस्कार सोहळ्यात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.