'...तरच आपलं भविष्य उज्ज्वल'; 'हाऊसफुल ५' फेम अभिनेता फरदीन खानने चाहत्यांना केलं 'या' गोष्टी टाळण्याचं आवाहन
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता फरदीन खान सध्या तरुण मनसुखानी दिग्दर्शित, ‘हाऊसफुल ५’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ वेब सीरिजमधून पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनय कौशल्यावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कायमच आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चर्चेत राहणाऱ्या अभिनेता फरदीन खान याने त्याच्या चाहत्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. दारू असो किंवा सिगारपासून दूर राहिल्यास चांगले भविष्य मिळेल, असं अभिनेत्याने भाष्य केलं आहे.
‘बॉर्डर २’ची शूटिंग केव्हा संपणार; सनी देओल म्हणाला, “सगळे मेहनत करतायत…”
दरम्यान, फरदीन खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाचे BTS फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये त्याने गुलाबी रंगाचा टी-शर्ट घालून सिगारेट ओढताना दिसत आहे. पोस्ट शेअर करताना, अभिनेत्याने कॅप्शनमध्ये त्याच्या चाहत्यांना धूम्रपान न करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता म्हणतोय की, “स्वतःसाठी का होईना लक्षात राहुद्या… धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार होतात आणि त्यामुळे अकाली मृत्यू होऊ शकतो. धुम्रपान करणं आजच सोडा, तुमचे शरीर, तुमचे प्रियजन आणि तुमचे भविष्य तुमचे आभार मानतील आणि भविष्य चांगले होईल..”
तब्बल १४ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर तो पुन्हा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये, ‘हिरामंडी’वेबसीरीजच्या माध्यमातून सक्रीय झाला आहे. १९९८ मध्ये ‘प्रेम अगन’ या चित्रपटामधून अभिनेत्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले. पण त्याच्या त्या पहिल्या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. फरदीन खान हा दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा आहे. त्यामुळे वडिलांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचं त्याच्यावर दडपण होतं. त्यात फरदीनच्या करिअरचा सुरुवातीचा काळ हा खूप संघर्षमय होता. ‘जानशीन’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘लव्ह के लिये कुछ भी करेगा’, ‘फिदा’ यांसारख्या काही हिट चित्रपटांनंतरही फरदीनला ते स्टारडम मिळू शकलं नाही, जे त्याच्या समकालीन कलाकारांना मिळालं.