Sunny Deol On Border 2
बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी ‘बॉर्डर २’ (Border 2 Movie) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘जाट'(Jaat Movie) चित्रपटामध्ये अफलातून ॲक्शन सीन्स दिल्यानंतर आता सनी देओलचे चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, सनी देओलने स्वतः त्याच्या आगामी ‘बॉर्डर २’ चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. चित्रपटाचे शूटिंग लवकरच संपणार असल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे.
अलीकडेच, सनी देओलने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ‘बॉर्डर २’ चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेबद्दलही अभिनेत्याने सांगितले आहे. मुलाखतीमध्ये सनी देओलने स्पष्ट केले की, “मी सध्या ‘बॉर्डर २’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. आशा आहे की, आम्ही पुढच्या २ ते ३ महिन्यांत आम्ही ‘बॉर्डर २’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण करू. आमचा २६ जानेवारी २०२६ रोजी अर्थात पुढच्या वर्षी चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस आहे. प्रत्येक जण कठोर परिश्रम करत आहे, आशा आहे की, एक चांगला चित्रपट बनेल.”
यापूर्वी, ‘बॉर्डर २’मधील सनी देओलचा फर्स्ट लूकही समोर आला होता. काही काळापूर्वी अभिनेता डेहराडूनमधील हल्दूवाला येथे चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंगदरम्यान, उत्तराखंड चित्रपट विकास परिषदेचे सीईओ बंशीधर तिवारी यांनी सेटला भेट दिली आणि सनी देओलची भेट घेतली. त्यावेळी समोर आलेल्या फोटोंमध्ये सनी देओलचा चित्रपटातील फर्स्ट लूक दिसत होता. फोटोंमध्ये, सनी लष्करी गणवेश परिधान केलेला, बंदूक धरलेला आणि डोक्यावर पगडी घातलेला दिसत होता.
‘या’ चित्रपटाच्या कथेने प्रेरित होऊन सोनमने केली पतीच्या हत्या, राजाच्या भावाचा धक्कादायक खुलासा
सनी देओलसोबत ‘बॉर्डर’मध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टीसारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट जेपी दत्ता, निधी दत्ता आणि टी-सीरीज प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवला जात आहे. ‘बॉर्डर २’ पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त २३ जानेवारी २०२६ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सनी देओलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, सनी शेवटचा ‘जाट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लवकरच आता अभिनेता, ‘जाट’नंतर ‘बॉर्डर २’, ‘लाहोर १९४७’ आणि नितेश तिवारीच्या ‘रामायण’ सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.