muramba fame actress shashwati pimplikar revealed exit reason from serial talk about health issue
‘बालक पालक’ चित्रपटातून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेल्या शाश्वती पिंपळकरने तिच्या तब्येतीविषयी तिने एक खुलासा केला आहे. दररोजच्या शुटिंगच्या बिझी शेड्युल्डमधून अभिनेत्रीला आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणं चांगलंच महागात पडलं आहे. अभिनेत्री शाश्वती पिंपळकर हिने आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिला नंतर परिणामी एका मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले आहे. अभिनेत्रीने याचा खुलासा एका मुलाखतीदरम्यान केलेला आहे.
‘बालिका वधू’ फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो व्हायरल!
रवी जाधव दिग्दर्शित ‘बालक पालक’ या लोकप्रिय चित्रपटामधून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हिने नुकतंच तिच्या आजारपणाबद्दल खुलासा केला आहे. वर्षभरापुर्वी अभिनेत्रीला एका आजाराचा सामना करावा लागला होता. आजारपणामुळे अभिनेत्रीने काही काळ अभिनयापासून ब्रेकही घेतला होता. याबद्दल तिने ‘हंच मीडिया’ला मुलाखतीत दिली आहे. ती म्हणाला की, “मी ‘मुरांबा’ मालिकेत साकारलेल्या आरती या पात्राला प्रेक्षकवर्गाने भरभरुन प्रतिसाद दिला. मालिकेतील माझ्या भूमिकेचं प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक देखील केलं. मालिकेतील माझी भूमिका छोटी असली तरीही प्रभावी होती. आजही मी त्या मालिकेला खूप मिस करतेय.”
आजारपणाबद्दल सांगताना शाश्वतीने सांगितलं की, “मी ‘मुरांबा’ मालिका करत असताना मला नॉर्मल सर्दी- खोकला होतो, तसा झाला होता. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच दरम्यान माझ्या घरी भावाच्या लग्नाची लगबग सुरु होती. त्यामुळे सगळी धावपळ सुरू होती आणि त्यात माझी शूटिंगचीही धावपळ सुरु होती. माझा २- ३ महिना सर्दी- खोकलाच जात नाहीये, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तोपर्यंत माझ्या फुप्फुसांना बऱ्यापैकी इन्फेक्शन झालं होतं. हे इन्फेशन इतकं होतं की मला अस्थमा होऊ शकला असता. जर जास्त काळ सर्दी- खोकला राहिला तर फुफ्फुसांच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. जेव्हा मी ‘मुरांबा’ मालिका सोडली तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की ३-४ पायऱ्या चढल्यानंतर मला थांबायला लागायचं.”
बाल जगदंबासमोर ‘माया’ उभी ठाकणार, असुरी शक्ती विरुद्ध दैवी शक्तीचा सामना रंगणार…
“आजारपणाबद्दल खूप उशिरा कळाल्यामुळे मी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. ‘मुरांबा’ मालिका सोडल्यानंतरही मला खूप शोच्या ऑफर आल्या होत्या. माझ्या आजारपणाबद्दल फारसं कोणाला माहिती नव्हतं. नाटकासाठीही विचारलं गेलं होतं. पण, मी सर्वांनाच नकार दिला होता. खरंतर, या काळात मी ठरवूनच सगळ्यांना नकार दिला होता. यातून बरं होणं माझ्यासाठी फार कठीण होतं. मी वर्कहोलिक आहे. त्यामुळे शांत बसणं मला आवडत नाही. अचानक काम बंद झाल्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावरही खूप परिणाम होतो. त्या एक ते दीड वर्षांच्या कठीण काळात माझ्यासोबत माझी फॅमिली, माझ्या जवळच्या मैत्रिणी माझ्या सोबत होते. खरंतर माझ्यासाठी तो फार अवघड काळ होता. यामधून मला बरं होण्यासाठी बराच काळ गेला.”