Govind Namdev Break Silence On Affair Rumors With 40 Years Younger Actress Shivangi Verma
९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते आणि खलनायक गोविंद नामदेव काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्माच्या सोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे चर्चेत होते. ७० वर्षीय गोविंद नामदेव आपल्या पेक्षा वयाने ४० वर्षे लहान असणाऱ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांमुळे त्यांच्यावर चहु बाजूंनी टीकेची झोड उठली होती. त्यांना नेटकऱ्यांनी तुफान ट्रोलही केलं होतं. आता या सर्वांवर स्वत: अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय खरं ? काय खोटं ? याबद्दल अभिनेत्याने मुलाखतीत सांगितलं आहे.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ७० वर्षीय गोविंद नामदेव यांनी ३१ वर्षीय शिवांगी वर्माला डेट करत असल्याच्या अफवांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “व्हायरल होत असलेला तो फोटो ‘गौरीशंकर गोहरगंज वाले’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन स्ट्रॅटेजी भाग होता. चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि शिवांगी वर्मा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चित्रपटाच्या स्ट्रॅटेजीबाबत अनेक गोष्टींवर आमची चर्चा झाली. शिवांगीने सुचवले की जर त्यांची ऑनस्क्रीन जोडी ऑफस्क्रीन देखील रोमँटिक पद्धतीने सादर केली गेली तर, चित्रपटाची चर्चा वाढेल. मी केवळ प्रमोशनसाठी या प्रमोशनल कन्सेप्टला मान्यता दिली होती. परंतु, त्यानंतर शिवांगीने मला न कळवता सोशल मीडियावर हे प्रमोशन पुढे नेले आणि चित्रपटाच्या हॅशटॅगसह सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली, ज्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले.”
‘बालिका वधू’ फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो व्हायरल!
या अफवा इतक्या पसरल्या की, गोविंद नामदेवच्या घटस्फोटाचीही चर्चा होऊ लागली आणि अखेर अभिनेत्याने पोस्ट करून हा गैरसमज दूर केला. मुलाखतीमध्ये अभिनेत्याने सांगितले की, “शिवांगीने माझ्या नावाचा गैरवापर केला ज्यामुळे मी अभिनेत्रीसोबत बोलणं बंद केलं. माझ्या आणि शिवांगीच्या नात्यातील चर्चांमुळे माझी धर्मपत्नी सुधा माझ्यावर चांगलीच रागावली होती. मी आणि माझी पत्नी वेगळं राहायचा विचार करत होतो. मी तेव्हाही कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती आणि आता सुद्धा मी कोणती प्रतिक्रिया दिली नसती. कारण, मी इथे कोणालाही काही सिद्ध करून दाखवायला आलेलो नाही.”
‘या’ चित्रपटाच्या कथेने प्रेरित होऊन सोनमने केली पतीच्या हत्या, राजाच्या भावाचा धक्कादायक खुलासा