प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाने ड्रायव्हरला चाकूने भोसकलं, नेमकं कारण काय ?
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक मनिष गुप्ता यांनी इंडस्ट्रीला ‘वन फ्रायडे नाईट’, ‘420 IPC’, ‘हॉस्टेल’, ‘सेक्शन 375’, ‘सरकार’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. कायमच आपल्या दमदार चित्रपटामुळे चर्चेत राहणारे मनिष गुप्ता सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. दिग्दर्शक मनीष गुप्ता याच्या विरोधात ड्रायव्हरला चाकूने भोसकून जखमी केल्याप्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्दर्शकाविरोधात गुन्हा मुंबईच्या वर्सोवा पोलिस स्थानकात करण्यात आला आहे.
वडिलंच बनले शत्रू, एकता कपूरच्या सिंगल बनण्यामागील कारण काय ?
ड्रायव्हरचा आणि मनिष गुप्ता यांच्यामध्ये पगारावरुन वाद झाला होता. वादाचं रुपांतर पुढे भांडणात झालं. वादाच्या भरात मनिषने ड्रायव्हरवर चाकुने हल्ला केला. या घटनेमध्ये दिग्दर्शकाचा ड्रायव्हर जखमी झाल्याची माहिती स्वत: मुंबई पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री मनिष गुप्ता यांच्या राहत्या घरामध्ये दिग्दर्शकाचा आणि ड्रायव्हरमध्ये वाद झाला. दिग्दर्शक मनिष गुप्ता मुंबईतील वर्सोवामधील सागर संजोग नावाच्या बिल्डिंगीमध्ये राहायला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मनिष गुप्ता यांच्या घरी राजीबुल इस्लाम लष्कर (32) ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचं वृत्त वर्सोवा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलं.
आईच्या मायेचा स्पर्श मनाला भावणारा आणि नात्याची गुंफण करणारं ‘तू नसशील तर’ गाणं रिलीज
ड्रायव्हर राजीबुल लष्करने एफआयआरमध्ये म्हटलंय की, तो मागील ३ वर्षांपासून मनीष गुप्ता यांच्याबरोबर काम करत होता. दिग्दर्शक त्याला मासिक पगार २३,००० रुपये देत होता, पण गुप्ता यांनी त्याला कधीच वेळेवर पगार दिला नाही, असा आरोप लष्करने केला. ३० मे रोजी गुप्ता यांनी लष्करला त्याचा पगार न देता त्याला कामावरून काढून टाकले. पगाराची थकबाकी हवी असल्याने लष्कर पुन्हा कामावर आला, पण तरीही त्याला पैसे दिले गेले नाहीत, असा त्याने दावा केला. यानंतर शुक्रवारी रात्री मनीष गुप्तांच्या वर्सोवा येथील घरी लष्करचा वाद झाला. शाब्दिक वादानंतर गुप्ता यांनी स्वयंपाकघरातील चाकूने वार केल्याचा आरोप लष्करने केला आहे.
पैशाने भरलेली बॅग कुठे ? ‘गाडी नंबर १७६०’ रहस्य आणि विनोदी टीझर रिलीज; लवकरच उलगडणार रहस्य
राजीबुल लष्करच्या म्हणण्यानुसार, एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वकिलाने चित्रपट निर्माते मनीष गुप्ता यांच्या अटकेची मागणी केली आहे. जखमी झाल्यावर राजीबुल लष्करला जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर राजीबुल लष्करने वर्सोवा पोलीस ठाण्यात मनीष गुप्ताविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, बॉलिवूड दिग्दर्शक मनिष गुप्ता यांच्यावर भारतीय न्याय संहिताच्या कलम ११८ (२), ११५(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण अद्याप त्यांना अटक झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.