अभिनेता हृतिक रोशनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘फायटर’ (Fighter ) रिलीजसाठी सज्ज आहे. हृतिक रोशन सोबत दीपिका पदुकोण, अनिल कपरूही चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, मात्र या चित्रपटासंदर्भात एक वाईट बातमी समोर येत आहे. फायटर हा चित्रपट पाच मोठ्या आखाती देशांमध्ये प्रदर्शित होणार नाही, कारण या देशांनी चित्रपटावर बंदी घातली आहे. बंदीचे कारण अद्याप समोर आले नाही आहे , मात्र यामुळे चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
[read_also content=”ऑस्कर 2024 पुरस्कारांसाठी नामांकनं जाहीर, ओपनहायमर आणि बार्बीने मारली बाजी, पहा संपूर्ण यादी! https://www.navarashtra.com/movies/oscars-2024-nominations-announced-oppenheimer-and-barbie-slay-see-full-list-501086.html”]
गिरीश जोहर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की, ‘फाइटर’ला मध्य पूर्व प्रदेशांमध्ये थिएटरमध्ये रिलीज करण्यासाठी अधिकृतपणे बंदी घालण्यात आली आहे. फक्त UAE ते PG 15 रेटिंगसह जारी करेल. सोशल मीडियावर माहिती देताना चित्रपट व्यवसाय तज्ञ गिरीश जोहर म्हणाले की, पाच मोठ्या आखाती देशांनी हृतिकच्या चित्रपटावर बंदी घातली आहे. ‘फायटर’ फक्त UAE मध्ये प्रदर्शित होईल, जिथे सेन्सॉर बोर्डाने PG15 रेटिंगसह पास केले आहे. गल्फ कोऑपरेशन कौन्सिल म्हणजेच GCC मध्ये बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांचा समावेश आहे. यापैकी यूएई वगळता इतर सर्व देशांनी ‘फायटर’वर बंदी घातली आहे. या बंदीचे कारण समोर आलेले नाही.
भारतीय चित्रपटांच्या विदेशी संग्रहात आखाती देशांचा मोठा वाटा आहे.मध्यपूर्वेतील हे देश भारतीय चित्रपटांसाठी चांगली बाजारपेठ असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीत ‘फायटर’सारख्या भव्य चित्रपटाला मोठी बाजारपेठ नसल्याचा परिणाम नक्कीच कमाईवर होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘फायटर’चे बजेट जवळपास 250 कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत काही मोठ्या बाजारातील कमाई थांबल्याचा परिणाम ‘फायटर’वर नक्कीच होईल.
हृतिक रोशन, दीपिका पदुकोण स्टारर ‘फाइटर’ ही हवाई दलाच्या लढाऊ वैमानिकांची कथा आहे जे पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ नष्ट करण्याच्या मोहिमेवर आहेत. या चित्रपटाची कथा बालाकोट एअर स्ट्राईकवर आधारित आहे. हृतिक आणि दीपिकासोबत या चित्रपटात अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर, संजीदा शेख आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही भूमिका आहेत.