saaisha bhoir and pooja bhoir
मुंबई:‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) या लोकप्रिय मालिकेमधील कार्तिकी या भूमिकेमुळे आणि ‘नवा गडी नवं राज्य’ (Nava Gadi Nava Rajya) या मालिकेतील चिंगी या भूमिकेमुळे बालकलाकार साईशा भोईरला (Saisha Bhoir) खूप लोकप्रिय आहे. याच साईशा भोईरच्या आईच्या विरोधात म्हणजेच पूजा भोईरच्या विरोधात कफ परेड पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून आज पोलिसांनी साईशाच्या कल्याणमधील घरात झाडाझडती घेतली आहे.
मुंबई कुलाबा परिसरात राहणारे मयुरेश पत्की यांची पत्नी नेहा यांची 2022 दरम्यान साईशा भोईरची आई पूजा भोईरशी ओळख झाली होती. पूजा भोईरची (Pooja Bhoir) मुलगी साईशाचा अभिनय अवडत असल्यानं नेहा या साईशाला इन्स्टाग्रामवर फॉलो करत होत्या. साईशा भोईरचं अकाउंट तिची आई पूजा भोईर ही वापरत होती. त्यामुळे इन्स्टाग्रामवर नेहा आणि पूजा भोईर यांची ओळख झाली.
[read_also content=”पीएमआरडीएच्या 1 हजार 926 कोटींच्या अर्थसंकल्पाला मिळाली मान्यता,अतिरिक्त विकास शुल्कही माफ केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा https://www.navarashtra.com/maharashtra/vchief-minister-eknath-shinde-approval-to-1-thousand-926-crore-budget-of-pmrda-nrsr-400710/”]
नेहा आणि पूजा या दोघी मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात राहिल्या.त्यांची फोनवर चांगलीच मंत्री झाली होती. पूजा ही अल्गो ऑप्शन्स स्ट्रेटरी मॉडेल्स नावाने गुंतवणुकीचा व्यवसाय करत असल्याचं तिनं नेहा यांना सांगितलं. तसेच गुंतवणुकीवर आठवड्यास दहा टक्के नफा मिळून देण्याचे आमिष दाखवून नेहा यांचा विश्वास संपादन करून पूजाने गुंतवणुकीची रक्कम परत मिळेल याची हमी देऊन नेहा यांना अल्गो ऑप्शन्स स्ट्रेटरी यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं. त्यानंतर नेहा पत्की यांनी पूजा भोईरच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यावर सहा लाख रुपये टाकले. असे करता करता पुढे नेहा यांनी सोळा लाख रुपये गुंतवणूक केली. काही दिवस गुंतवणुकीचा परतावा मिळाला. मात्र नंतर हा परतावा देण्यास पूजाकडून टाळाटाळ सुरु झाली. पूजानं नेहा यांना परताव्याचा चेक देखील दिला होता मात्र तो चेक बाऊन्स झाला याबाबत नेहा यांनी पुजाला विचारले असता तिने तक्रारदाराला आरेरावीचे उत्तर दिले. अखेर याप्रकरणी कफ परेड रोड पोलिसांनी पूजा भोईरच्या कल्याणमधील घरात छापमारी करत पूजा भोईरला ताब्यात घेतलं आहे.