Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: “दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी…”; CM देवेंद्र फडणवीसांचे गौरवोद्गार

भोईवाडा येथील स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवन उद्यान येथे साजऱ्या होत असलेल्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोविंदा व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 16, 2025 | 07:19 PM
Devendra Fadnavis: “दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी…”; CM देवेंद्र फडणवीसांचे गौरवोद्गार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे भारतीय सैन्य दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि विचार प्रत्यक्षात उतरवला. पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट करून शत्रूला धडा शिकविला आणि आपल्या शौर्याची जगासमोर प्रचिती दिली आहे. आजच्या या दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्याचे सुंदर काम केले आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शहर व उपनगरातील विविध कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,“दहीहंडी उत्सवाला उपस्थित असलेल्या सैन्य दलातील जवानांना व त्यांच्या शौर्याला मी मनःपूर्वक सलाम करतो. सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून घाटकोपर येथील उत्सवाने जे कार्य केले आहे ते उल्लेखनीय आहे. गोविंदा पथकांनी उभारलेले थर सैन्य दलाच्या शौर्यासाठी अर्पण केले आहेत, ही एक प्रेरणादायी बाब आहे.”

मुंबई शहर व उपनगरातील विविध दहीहंडी उत्सव कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

विक्रोळी येथील टागोर नगरमध्ये आरंभ दहीहंडी कार्यक्रमास उपस्थित राहून मुख्यमंत्री म्हणाले, “दहीहंडी उत्सवात एकावर एक थर लावला जातो, तेव्हा हा संपूर्ण समाज एकत्रित असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला जातो. सर्वांनी एकसंघ राहून पुढे जाण्याचे हे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आयोजित 'दहीहंडी'… (मुंबई | 16-8-2025)#Maharashtra #Mumbai #DahiHandi2025 pic.twitter.com/6q445ioKHc — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 16, 2025

वरळी जांबोरी मैदानावर आयोजित परिवर्तन दहीहंडी उत्सवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे सादरीकरण कलाकारांनी केले. उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच, भोईवाडा येथील स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवन उद्यान येथे साजऱ्या होत असलेल्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोविंदा व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

गोविंदांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात शनिवारी सकाळपासून मुंबईतील गोविंदा पथके दाखल झाली आहेत. यापैकी कोकणनगर गोविंदा पथकाने वर्तकनगर येथील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात दहा थर लावून विश्वविक्रम केला. या विक्रमानंतर मंत्री सरनाईक यांनी मंडळाला २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

Web Title: Cm devendra fadnavis attend dahihandi operation sindoor mumbai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 07:19 PM

Topics:  

  • Dahi Handi 2025
  • DCM Devendra Fadnavis
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच
1

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच

धूळ प्रदूषणामुळे मुंबईला त्रास! पालिकेच्या पर्यावरण विभागाकडे कारवाईचा अहवाल उपलब्ध नसल्याचा धक्कादायक खुलासा
2

धूळ प्रदूषणामुळे मुंबईला त्रास! पालिकेच्या पर्यावरण विभागाकडे कारवाईचा अहवाल उपलब्ध नसल्याचा धक्कादायक खुलासा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘या’ प्रभागात होणार नाहीत निवडणुका; उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती
3

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘या’ प्रभागात होणार नाहीत निवडणुका; उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती

Maharashtra Politics: “अहमदनगर नव्हे अहिल्यानगरचा महापौर…”; CM फडणवीसांची तोफ धडाडली
4

Maharashtra Politics: “अहमदनगर नव्हे अहिल्यानगरचा महापौर…”; CM फडणवीसांची तोफ धडाडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.