Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ट्रेलर रिलीज करा, नाहीतर…”, राम चरणच्या चाहत्याने ‘गेम चेंजर’ चित्रपटाबद्दल निर्मात्यांना दिली धमकी; सुसाईड नोट व्हायरल

१० जानेवारीला अभिनेता रामचरणचा 'गेम चेंजर' चित्रपट येतोय. चित्रपट प्रदर्शनाला काही दिवसच शिल्लक राहिले. ट्रेलर रिलीजला जास्त वेळ लागत असल्यामुळे रामचरणच्या चाहत्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना RIP लेटर लिहिलंय.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 29, 2024 | 05:09 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

टॉलिवूड सेलिब्रिटींची त्यांच्या चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ आहे. मग त्या आवडत्या सेलिब्रिटीचं मंदिर बनवणे असो, रिलीजच्या पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये आवडत्या सेलिब्रिटी दुग्धाभिषेक करणे असो किंवा त्याचा चित्रपट पहिल्याच दिवशी जाऊन पाहणे असो…. अशा अनेक वेगवेगळ्या घटना तुम्ही आम्ही पाहिल्या आहेत आणि ऐकल्याही आहेत. पण आम्ही तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहोत, जिची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. येत्या १० जानेवारीला टॉलिवूड अभिनेता रामचरणचा ‘गेम चेंजर’ चित्रपट येतोय. त्याच्या ह्या चित्रपटाबद्दल त्याच्या एका चाहत्याने थेट ‘RIP लेटर’ लिहिलंय.

मराठी सेलिब्रिटींचा प्राजक्ता माळीला “फुल्ल ऑन सपोर्ट…”, “जाहीर निषेध” म्हणत शेअर केल्या पोस्ट

व्हायरल होत असलेल्या पत्रात एका चाहत्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना ट्रेलर लवकरात लवकर रिलीज करावा यासाठीच धमकी दिली आहे. हे धमकीचं पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवसच आता शिल्लक राहिले आहेत. ट्रेलर रिलीजला जास्त वेळ लागत असल्यामुळे रामचरणच्या चाहत्याने चित्रपटाच्या निर्मात्याने सोशल मीडियावरून RIP लेटर लिहिलं आहे. यात त्याने ‘गेम चेंजर’च्या ट्रेलरबाबत कोणतेही अपडेट देत नसल्याची तक्रार केली आहे, त्यामुळे त्याला हे पाऊल उचलावे लागत आहे, असे त्याचे म्हणणे आहे. हे पत्र चाहत्याने तेलुगूमध्ये लिहिले आहे.

 

గేమ్ ఛేంజర్ ట్రైలర్ రిలీజ్ చేయకుంటే ఆత్మహత్య చేసుకుంటా గేమ్ ఛేంజర్ టీమ్‌కు రామ్ చరణ్ అభిమాని సూసైడ్ లెటర్#GameChanager #RamCharan𓃵 pic.twitter.com/aHekTA8iCz — Telugu Scribe (@TeluguScribe) December 28, 2024

व्हायरल होत असलेल्या पत्रात चाहत्याने लिहिलंय की, “तुम्ही चाहत्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करताय. तुम्ही जर या महिन्याअखेरीस किंवा नवीन वर्षाच्या निमित्ताने गेम चेंजरच्या ट्रेलरबद्दल कोणतीही अपडेट किंवा सिनेमाचा ट्रेलरच जर रिलीज केला नाही, तर मला हे सांगण्यात अतिशय दुःख होतंय की, मी माझं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचलेन.” चाहत्याने लिहिलेलं हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. ‘RIP Letter’ असं त्याने त्या पत्राला शीर्षक दिलं होतं. ‘RIP लेटर’ लिहिणाऱ्या चाहत्याचं नाव ईश्वर असं आहे. सध्या सोशल मीडियावर ईश्वरने लिहिलेलं लेटर प्रचंड व्हायरल होत असून आता निर्माते चित्रपटाच्या ट्रेलरची पुढची अपडेट केव्हापर्यंत देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्याने बायकोला दिलं स्पेशल गिफ्ट, पोस्ट शेअर करत म्हणाला…

चित्रपटाचे कथानक कार्तिक सुब्बाराव यांनी लिहिले असून एस यू वेंकटेशन आणि विवेक यांची कथा आहे. दिल राजू आणि सिरिश चित्रपटाची निर्माती केली असून ‘शिवाजी द बॉस’ फेम शंकर सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, चित्रपटाचे संगीत थमन एस यांनी दिले आहे. कियारा आणि रामचरण व्यतिरिक्त चित्रपटात अंजली, समुथिराकणी, एसजे सूर्या, श्रीकांत, प्रकाश राज आणि सुनील देखील दिसणार आहेत. ‘गेम चेंजर’ सर्व दक्षिण भारतीय भाषा आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच १० जानेवारी २०२५ मध्ये चित्रपट रिलीज होणार आहे.

Web Title: Game changer ram charan fan threatened the makers with suicide said release the trailer of game changer otherwise i will commit suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 05:09 PM

Topics:  

  • KIARA ADVANI
  • Ram Charan
  • tollywood movie

संबंधित बातम्या

‘जन नायकन’च्या प्रदर्शनावर टांगती तलवार; मद्रास उच्च न्यायालयाची सुनावणी, काय होणार विजयच्या शेवटच्या चित्रपटाचं?
1

‘जन नायकन’च्या प्रदर्शनावर टांगती तलवार; मद्रास उच्च न्यायालयाची सुनावणी, काय होणार विजयच्या शेवटच्या चित्रपटाचं?

दुसऱ्यांदा बाबा होणार ‘जवान’ दिग्दर्शक! पत्नीसह फोटो शेअर करत चाहत्यांना दिली Good News; पाहा फोटो
2

दुसऱ्यांदा बाबा होणार ‘जवान’ दिग्दर्शक! पत्नीसह फोटो शेअर करत चाहत्यांना दिली Good News; पाहा फोटो

धनुषच्या चाहत्यांना पोंगलचे मिळाले सरप्राईज; अभिनेत्याने पुढच्या चित्रपटाचे पोस्टर केले रिलीज, निर्मात्यांनी शीर्षकही केले उघड
3

धनुषच्या चाहत्यांना पोंगलचे मिळाले सरप्राईज; अभिनेत्याने पुढच्या चित्रपटाचे पोस्टर केले रिलीज, निर्मात्यांनी शीर्षकही केले उघड

‘जन नायकन’ चित्रपटाला मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या याचिका; विजयकडे राहिला नाही कोणता पर्याय?
4

‘जन नायकन’ चित्रपटाला मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या याचिका; विजयकडे राहिला नाही कोणता पर्याय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.