'पंचायत'नंतर आता 'ग्राम चिकित्सालय' हटके वेबसीरिज येतेय, कधी आणि कुठे रिलीज होणार ?
‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’वरील ‘पंचायत’ वेबसीरीजचे लाखो चाहते आहेत. ह्या बहुचर्चित वेबसीरीजचे फक्त भारतातच नाही तर, जगभरातही फार मोठा चाहतावर्ग आहे. या वेबसीरीजचे आतापर्यंत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता लवकरच या सीरीजचा चौथा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हलकी फुलकी कहाणी आणि दमदार अभिनय यामुळे सर्वांचीच आवडती बनलेल्या ह्या सीरीजचे निर्माते लवकरच चाहत्यांच्या भेटीला एक नवी कोरी वेबसीरीज घेऊन येत आहेत. ‘टीव्हीएफ’ (The Viral Fever) ओरिजिनल ‘पंचायत’चे मेकर्स आता ‘ग्राम चिकित्सालय’ (Gram Chikitsalay) नावाची एक नवी कोरी वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, “४ आणि ५ मे रोजी…”
‘पंचायत’च्या भरघोस यशानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला ‘ग्राम चिकित्सालय’ नावाची सीरीज येत आहे. या सीरीजमध्ये प्रेक्षकांना एका गावाची हलकी फुलकी कहाणी यातून पाहायला मिळणार आहे. ‘पंचायत’ सीरीजनंतर ‘ग्राम चिकित्सालय’ही सीरीज सुद्धा TVF बॅनरच्या खाली तयार करण्यात आलेली आहे. या सीरीजचेही क्रिएटर आणि दिग्दर्शक दीपक मिश्राच आहे. पाच एपिसोड्सची असणारी ही वेबसीरीज येत्या ९ मे रोजी ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’वर रिलीज होणार आहे. शहरातला डॉक्टर एका दूरच्या गावात बंद पडत आलेल्या एका स्वास्थ्य केंद्राला पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करतो. या प्रवासात त्याला गावात काय अडचणी येतात, गावकऱ्यांच्या विचित्र शंकांना तो कसा सामोरा जातो हे सीरीजमध्ये दाखवण्यात आले आहे.
“गर्दी दिसली की…”; पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंबंधित विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत
‘ग्राम चिकित्सालय’मध्ये अमोल पराशर आणि विनय पाठक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, त्यांच्यासोबत आकांक्षा रंजन कपूर, आनंदेश्वर द्विवेदी, आकाश मखीजा आणि गरिमा विक्रांत सिंग सारखे प्रतिभावान कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. ही मालिका ९ मे पासून फक्त भारतात आणि जगभरातील २४० हून अधिक देशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रसारित होईल. ‘ग्राम चिकित्सालय’ची गोष्ट वैभव सुमन आणि श्रेया श्रीवास्तव यांनी लिहिली आहे. तर राहुल पांडेने सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.