(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवार, २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश हादरला आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या या घटनेचे अनेक हृदयद्रावक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत. घटनेमध्ये २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांकडून सरकारने या हल्ल्याचा सरकारने बदला घेण्याची मागणी केली जात आहे. कलाक्षेत्रातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया येत असताना आता बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने पहलगाम हल्ल्यानंतर एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा निर्णय जाहीर केला आहे.
“गर्दी दिसली की…”; पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंबंधित विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत
काही तासांपूर्वी भाईजानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर आगामी युके टूर संदर्भात एक पोस्ट शेअर केली. शेअर केलेल्या पोस्टमध्ये सलमानने लिहिलंय की, “काश्मीरमध्ये नुकतीच जी दुःखद घटना घडली ती डोळ्यासमोर ठेऊन आम्ही जड अंतःकरणाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या ४ आणि ५ मे रोजी मॅनचेस्टर आणि लंडनमध्ये होणारा ‘द बॉलीवुड बिग वन शो यूके’ हा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. आमचे चाहते या शोची खूप वाट पाहत होते. परंतु सध्याच्या कठीण काळात हा शो पुढे ढकलणं हाच आमच्यासाठी उत्तम निर्णय आहे. तुम्हाला आमच्या निर्णयामुळे कोणत्याही प्रकारची असुविधा निर्माण झाली असेल तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तुमचा पाठिंबा आणि समजुतदारपणा याची आम्हाला गरज आहे. या शोच्या नवीन तारखांची घोषणा लवकरच केली जाईल”
‘Raid 2’ वर सेन्सॉर बोर्डने चालवली कात्री, अजय देवगणचे आठ सेकंदांचे संवाद हटवले; बदलणार ‘हे’ शब्द!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सलमानने अशा शब्दात पोस्ट लिहित त्याचा निर्णय जाहीर केलाय. देश दुःखात असताना सलमानने हा बिग बजेट शो स्थगित करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचं सर्वच स्तरातून कौतुक केलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीच सलमानने हल्ल्यावर भाष्य केलं होतं. सलमान खानने त्याच्या X अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, “पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरला नरकात बदललं जात आहे. निर्दोष लोकांना लक्ष्य केलं जात आहे. एकाही निर्दोष व्यक्तीला मारणं हे संपूर्ण विश्वाला मारण्यासारखं आहे.”