Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गुलाबी साडी’ फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन; नवऱ्याने शेअर केली ‘गुड न्यूज’…

सध्या अभिनेत्री प्राजक्ता घाग तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ता घाग हिने चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 17, 2025 | 05:54 PM
‘गुलाबी साडी’ फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन; नवऱ्याने शेअर केली 'गुड न्यूज'...

‘गुलाबी साडी’ फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन; नवऱ्याने शेअर केली 'गुड न्यूज'...

Follow Us
Close
Follow Us:

संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ गाण्याची अजूनही क्रेझ काही कमी झालेली नाही. अगदी मराठी इंडस्ट्रीपासून बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक सिने तारकांनाही संजू राठोडने या गाण्यावर थिरकायला भाग पाडले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या वरातीत सुद्धा बॉलिवूड सेलिब्रिटींनी ‘गुलाबी साडी’गाण्यावर मनसोक्त ठेका धरला होता. गाण्याची जगभरात चर्चा सुरु असताना सध्या गाण्यातल्या कलाकारांचीही जोरदार चर्चा होताना दिसते. गाण्यामध्ये मुख्य भूमिकेत संजू राठोडसोबत अभिनेत्री प्राजक्ता घाग आहे. सध्या अभिनेत्री प्राजक्ता घाग तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ता घाग हिने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे.

प्रसिद्ध नायिकेचं ३ महिन्यातंच पुनरागमन! ‘स्टार प्रवाह’वरील नव्या मालिकेत दिसणार खास अंदाजात, पाहा प्रोमो

‘गुलाबी साडी’ फेम प्राजक्ता घाग हिने काही तासांपूर्वीच चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. एका चिमुकलीला अभिनेत्रीने जन्म दिलेला आहे. १६ मार्चला म्हणजेच रविवारी प्राजक्ताच्या घरी चिमुकलीचं आगमन झालेलं आहे. तिच्या नवऱ्याने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. प्राजक्ता घागने गेल्या काही दिवसांपूर्वीच बेबी बंपसोबत फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिने त्या मॅटर्निटी फोटोशूटला लवकरच आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता अभिनेत्रीने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिल्यानंतर तिच्यावर आणि तिच्या पतीवर चाहते कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.

‘कधीतरी तुला पुढचा संकर्षण फोन करेल…’ फोन कॉलवर जितेंद्र जोशीने अभिनेत्याला दिला मोलाचा सल्ला

प्राजक्ताच्या नवऱ्याचं नाव रोहित बोराडे असं आहे. तो पेशाने फिटनेस ट्रेनर आहे. रोहित आणि प्राजक्ता यांनी “वेलकम टू द वर्ल्ड बेबी गर्ल १६ मार्च २०२५” अशी पोस्ट शेअर करत कन्यारत्न झाल्याची आनंदाची बातमी त्यांनी सर्वांना दिली आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ता आणि रोहितवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान,‘गुलाबी साडी’गाण्यात अभिनेत्री प्राजक्ता घाग संजू राठोडसोबत मुख्य भूमिकेत होती. प्राजक्ताने संजू राठोडसोबत ‘नऊवारी पाहिजे’ आणि ‘कसं डिंपल येतय गालावरी’ या गाण्यांमध्येही काम केलं आहे.

Asian Awards: ‘ऑल व्ही इमॅजिन ॲज लाइट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; शहाना गोस्वामी यांच्या ‘संतोष’ चित्रपटाला मिळाला पुरस्कार!

Web Title: Gulabi sadi actress prajakta ghag welcomes baby girl shared good news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 05:54 PM

Topics:  

  • marathi actress
  • Television Actress
  • viral Song

संबंधित बातम्या

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”
1

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”

“आता मला सोशल मीडियाची भीती वाटते..”, प्राजक्ता माळी असं का म्हणाली?
2

“आता मला सोशल मीडियाची भीती वाटते..”, प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

मराठवाड्यातील पूरपरिस्थिती पाहून संकर्षण कऱ्हाडेने केलं मदतीचं आवाहन, म्हणाला, ”हे फार क्लेशदायक..”
3

मराठवाड्यातील पूरपरिस्थिती पाहून संकर्षण कऱ्हाडेने केलं मदतीचं आवाहन, म्हणाला, ”हे फार क्लेशदायक..”

‘कमळी’ची जागतिक झेप, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला मराठी मालिकेचा प्रोमो
4

‘कमळी’ची जागतिक झेप, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला मराठी मालिकेचा प्रोमो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.