मुरलेल्या प्रेमाचा गोडवा देणाऱ्या ‘गुलकंद’चा हटके मोशन पोस्टर रिलीज, हास्यजत्रेची टीमकडून चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा
‘गुलकंद’ हा पदार्थ आपण गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवतात. हा पदार्थ तुम्ही असाही खाऊ शकता किंवा दुधासोबत किंवा मिठाईसोबतही खाऊ शकता. अनेकांचा आवडता हा गोड पदार्थ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अहो हो खरंच… हा चित्रपट येत्या १ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांचे लाडके ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तले कलाकार असणार आहे. सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक आणि ईशा डे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘गुलकंद’ या बहुचर्चित चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हीच उत्सुकता कायम ठेवत संक्रांतीनिमित्त ‘गुलकंद’च्या टीमने प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘गेम चेंजर’च्या निर्मात्यांकडून ४५ जणांविरोधात तक्रार दाखल, नेमकं कारण काय ?
चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकारांनी इन्स्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर करत चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कलाकारांनी शेअर केलेले हे मोशन पोस्टर पाहून मात्र चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल एक कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये सई, समीर, प्रसाद आणि ईशा यांचे पतंग आकाशात उंच भरारी घेताना दिसत असतानाच यात काही गुंतागुंतही दिसत आहे. कधी समीर आणि सईची पतंग एकत्र दिसत आहे तर कधी प्रसाद आणि सईची पतंग उडताना दिसत आहे. मध्येच समीर आणि ईशाची पतंगही भरारी घेताना दिसत आहे. त्यामुळे कोणाची पतंग कुठे चालली आहे, हे बघायला मजा येणार आहे. मात्र यासाठी प्रेक्षकांना १ मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
या दिवशी फक्त ९९ रुपयांत पहा तुमचा आवडीचा चित्रपट; हे सिनेमागृह मनोरंजन करण्यासाठी सज्ज!
एव्हरेस्ट मराठीच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा मोशन पोस्टर शेअर करण्यात आलेला आहे. मोशन पोस्टरचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “येत्या उन्हाळ्यात सहकुटुंब अनुभवू गुलकंदाचा गारवा… झटकू संसारातली जळमटं, जपू मुरलेल्या नात्याचा गोडवा, सर्वांना शुभ मकरसंक्रांत…. गुलकंद १ मे पासून सर्वत्र प्रदर्शित एक fam-com सिनेमा.” एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित, सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया हे चित्रपटाचे निर्माते आहेत.