Vikram Gokhale
मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील चतुरस्थ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीसह सर्वस्थरातून हळहळ व्यक्त कलेची जात आहे. विक्रम गोखले हे एक प्रशंसनीय स्टेज, टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेते होते, ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. विक्रम यांनी आपल्या नावाप्रमाणे अनेक अविस्मरणीय पात्रे आणि कामगिरी करून एक उत्कृष्ट कलाकार म्हणून प्रेक्षकांवर आपली छाप सोडली.
विक्रम गोखले यांनी २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या महेश मांजरे दिग्दर्शित ‘नटसम्राट’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. यावेळी नटसम्राटची भूमिका करणारे अभिनेते नाना पाटेकर यांच्या सोबत विक्रम गोखले यांचा एक आयकॉनिक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
RIP Vikram Gokhle ?
This scene from natsamrat, will always iconic.#vikramgokhale pic.twitter.com/Lawt5fkhoa— Yogesh (@Nifty4500) November 26, 2022