‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ या विलक्षण प्रेमकहाणीनंतर झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. ‘ही अनोखी गाठ’ (Hi Anokhi Gath) असे या चित्रपटाचे नाव असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असतानाच आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांचे असून यात श्रेयश तळपदे (shreyas talpad) गौरी इंगवले (gauri ingwale), ऋषी सक्सेना (rishi saksena), शरद पोंक्षे (Sharad Pokshe), सुहास जोशी (Suhas Joshi) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
[read_also content=”‘भूल भुलैया 3’ मध्ये आता डबल भुतांची मजा! कार्तिक आर्यन एक नाही तर दोन भूतांशी लढणार, विद्या बालनसह ‘या’ अभिनेत्रीचीही एन्ट्री! https://www.navarashtra.com/movies/not-only-vidya-balan-but-asklo-madhuru-dixit-will-be-a-part-of-kartik-aaryan-bhul-bhulaiya-3-nrps-506725.html”]
चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, “नात्याची एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयससोबत प्रथमच काम करतोय. त्याचा अभिनय मी पाहिला आहे. तो अतिशय हुशार अभिनेता आहे. एक कलाकार म्हणून स्वतःला नेहमीच समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तिरेखेला तो शंभर टक्के न्याय देतो. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. या चित्रपटात ऋषीचीही भूमिका आहे. ‘ही अनोखी गाठ’च्या निमित्ताने गौरीला पुन्हा एकदा तिचे नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी मिळाली आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात अनेक नावाजलेले कलाकार आहेत. खूप साधी, सरळ तरीही अनोखी अशी ही प्रेमकहाणी आहे. झी स्टुडिओजसोबत याआधी बरेच चित्रपट केले आहेत, त्यामुळे त्य्नाच्यासोबतचा अनुभव हा नेहमीच कमाल असतो. एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत, खात्री आहे प्रेक्षक त्याला इतर चित्रपटांप्रमाणेच आपलेसे करतील.”
श्रेयस तळपदे आपल्या ‘ही अनोखी गाठ’च्या अनुभवाबद्दल बोलतो, ” सध्याच्या काळात आपण सगळेच एका निर्मळ प्रेमकथेला मुकले आहोत. प्रेमकथेतील निरागसता हरवत चालली आहे आणि अशावेळी महेश दादांनी मला ‘ही अनोखी गाठ’ची गोष्ट ऐकवली. त्या क्षणीच मी ठरवले हा चित्रपट करायचाच. मुळात महेश सर खूप निवडक सिनेमे करतात, त्यातही त्यांचे विषय वेगळे असतात. त्यामुळे या चित्रपटाचा मी भाग होतोय, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. महेश दादा आणि झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव मस्तच होता. मला खात्री आहे ही अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांनाही आवडेल.”