Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री; ‘लग्नाचा शॉट’मधील ‘रेशमी बंध’ गाणं रिलीज

‘लग्नाचा शॉट’ हा आगामी मराठी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अशातच आता या चित्रपटामधील पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ज्यामध्ये अभि–कृतिकाची केमिस्ट्री दिसून आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 26, 2026 | 11:27 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री
  • ‘लग्नाचा शॉट’मधील ‘रेशमी बंध’ गाणं रिलीज
  • ‘लग्नाचा शॉट’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

मराठी चित्रपटसृष्टीत लव्हस्टोरीचा नवा रंग भरण्यासाठी आगामी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ सज्ज झाला असून चित्रपटातील अभिजीत आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर या नव्या जोडीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटातील ‘रेशमी बंध’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात या फ्रेश जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळते. प्रदर्शित होताच या गाण्याने आपल्या हळव्या सुरांमुळे आणि मनाला भिडणाऱ्या दृश्यांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Padma Awards 2026: धर्मेंद्र यांना पद्मविभूषण, ममूटी यांना पद्मभूषण; ज्युनियर एनटीआरने व्यक्त केला आनंद, म्हणाला ‘हा सन्मान..’

‘रेशमी बंध’ या गाण्यात अभि आणि कृतिका यांच्या प्रेमकथेची सुरुवात उलगडताना पाहायला मिळते आहे. निसर्गरम्य वातावरणात उमलणारं त्यांचं नातं, नजरेतून व्यक्त होणारी ओढ आणि एकमेकांच्या सहवासात वाढणारी जवळीक या गाण्यात अत्यंत सौम्य आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे. निसर्गसौंदर्यात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आल्यामुळे हे गाणं अधिकच लक्षवेधी ठरत आहे. या गाण्याचं संगीत आणि गीतलेखन प्रविण कोळी आणि योगिता कोळी यांनी केले आहे. केवल वाळंज आणि स्नेहा महाडिक यांच्या मधुर स्वरांनी गाण्यात अधिकच रंगत आणली आहे.

 

या चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय गोरे याबद्दल सांगताना म्हणाले, “‘रेशमी बंध’ हे गाणं अभि आणि कृतिकाच्या नात्याची पहिली ओळख आहे. ज्यात त्यांच्या खुलणाऱ्या प्रेमाची झलक पाहायला मिळते आहे. अभि-कृतिकाची केमिस्ट्री, आजूबाजूचे निसर्गसौंदर्य आणि गाण्याचे सुमधूर संगीत यामुळे प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.” असे ते म्हणाले आहेत.

Border 2 Collection: रविवारी ‘बॉर्डर २’ ने ओलांडला १५० कोटींचा टप्पा; तिसऱ्या दिवशी ६ मोठ्या चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली असून अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकार, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: The first song reshmi bandh from the marathi movie lagnacha shot has been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Border 2 Collection: रविवारी ‘बॉर्डर २’ ने ओलांडला १५० कोटींचा टप्पा; तिसऱ्या दिवशी ६ मोठ्या चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड
1

Border 2 Collection: रविवारी ‘बॉर्डर २’ ने ओलांडला १५० कोटींचा टप्पा; तिसऱ्या दिवशी ६ मोठ्या चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

Padma Awards 2026: धर्मेंद्र यांना पद्मविभूषण, ममूटी यांना पद्मभूषण; ज्युनियर एनटीआरने व्यक्त केला आनंद, म्हणाला ‘हा सन्मान..’
2

Padma Awards 2026: धर्मेंद्र यांना पद्मविभूषण, ममूटी यांना पद्मभूषण; ज्युनियर एनटीआरने व्यक्त केला आनंद, म्हणाला ‘हा सन्मान..’

Laughter Chefs Season 3 Winner: अखेर टीम काटाने उचलली ‘Laughter Chefs’ची ट्रॉफी, समर्थ- अभिषेकमुळे मिळवला विजय
3

Laughter Chefs Season 3 Winner: अखेर टीम काटाने उचलली ‘Laughter Chefs’ची ट्रॉफी, समर्थ- अभिषेकमुळे मिळवला विजय

कार्तिक–दीपासाठी लव्ह मिशन! ‘शहजादे शहजादी ले जायेंगे’चा प्रोमो चर्चेत
4

कार्तिक–दीपासाठी लव्ह मिशन! ‘शहजादे शहजादी ले जायेंगे’चा प्रोमो चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.