Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध मराठमोळा इन्फ्लुएन्सर Prathmesh Kadam याचे निधन; आईचेही लाखो चाहते, मायलेकाच्या जोडीने मिळवली प्रसिद्धी

प्रसिद्ध लोकप्रिय इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम याचे निधन झाले आहे, या बातमीने त्याच्या चाहत्यांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तसेच सगळे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 26, 2026 | 12:11 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रसिद्ध लोकप्रिय इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचे निधन
  • मायलेकाच्या जोडीने चाहत्यांचे जिंकले मन
  • जवळच्या व्यक्तीने केली पुष्टी
 

मराठमोळा रिल स्टार आणि लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम यांचं निधन झाल्याचे समोर आले आहे. प्रथमेशच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडिया विश्वात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश आजारी होता. आज त्याच्या मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दुःखद बातमी सर्वांना कळवली आहे. आणि या बातमीने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याने आणि त्याच्या आईने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केलं आहे.

Border 2 Collection: रविवारी ‘बॉर्डर २’ ने ओलांडला १५० कोटींचा टप्पा; तिसऱ्या दिवशी ६ मोठ्या चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

प्रथमेश कदम आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांची माय-लेकाची जोडी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांचे रिल्स नेटकऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरले होते. काही वर्षांपूर्वी प्रथमेशच्या वडिलांचं निधन झाले होते. त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी प्रथमेशवर आली होती. घराची जबाबदारी सांभाळतानाच त्याने या दुःखातून सावरत आईलाही खंबीरपणे आधार दिला होता. आणि या दोघांचे एकमेकांवरचे प्रेम पाहून चाहते देखील त्याला पसंत करू लागले.

 

गेल्या अनेक वर्षांपासून प्रथमेश आणि त्याची आई एकत्र रिल्स बनवत होते. त्यांच्या व्हिडीओंना केवळ प्रेक्षकांचाच नव्हे, तर अनेक मराठी कलाकारांचाही भरभरून प्रतिसाद मिळत होता. मात्र प्रथमेशच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रथमेशचा जवळचा मित्र तन्मय पाटेकर याने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, “तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश. देवाघरी स्वतःची काळजी घे रे! खूप आठवण येईल तुझी… Miss You Bhai.” असे लिहून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री; ‘लग्नाचा शॉट’मधील ‘रेशमी बंध’ गाणं रिलीज

साधा, प्रेमळ स्वभाव आणि नृत्यकलेमुळे प्रथमेशने अल्पावधीतच लाखो चाहत्यांची मनं जिंकली होती. आधी पती आणि आता मुलाचं छत्र हरपल्याने प्रथमेशच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण काळात प्रथमेशचे मित्र, चाहते आणि संपूर्ण सोशल मीडिया विश्व त्याच्या आईच्या दुःखात सहभागी आहेत. प्रथमेशने आता अखेरचा श्वास घेऊन चाहत्यांचा आणि कुटुंबाचा निरोप घेतला आहे, परंतु चाहत्यांच्या मनात त्याच्या आठवणी नेहमीच जिवंत राहणार आहे.

Web Title: Reel star prathamesh kadam passes away fans shocked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • Social Media

संबंधित बातम्या

प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री; ‘लग्नाचा शॉट’मधील ‘रेशमी बंध’ गाणं रिलीज
1

प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री; ‘लग्नाचा शॉट’मधील ‘रेशमी बंध’ गाणं रिलीज

Border 2 Collection: रविवारी ‘बॉर्डर २’ ने ओलांडला १५० कोटींचा टप्पा; तिसऱ्या दिवशी ६ मोठ्या चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड
2

Border 2 Collection: रविवारी ‘बॉर्डर २’ ने ओलांडला १५० कोटींचा टप्पा; तिसऱ्या दिवशी ६ मोठ्या चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

Padma Awards 2026: धर्मेंद्र यांना पद्मविभूषण, ममूटी यांना पद्मभूषण; ज्युनियर एनटीआरने व्यक्त केला आनंद, म्हणाला ‘हा सन्मान..’
3

Padma Awards 2026: धर्मेंद्र यांना पद्मविभूषण, ममूटी यांना पद्मभूषण; ज्युनियर एनटीआरने व्यक्त केला आनंद, म्हणाला ‘हा सन्मान..’

Laughter Chefs Season 3 Winner: अखेर टीम काटाने उचलली ‘Laughter Chefs’ची ट्रॉफी, समर्थ- अभिषेकमुळे मिळवला विजय
4

Laughter Chefs Season 3 Winner: अखेर टीम काटाने उचलली ‘Laughter Chefs’ची ट्रॉफी, समर्थ- अभिषेकमुळे मिळवला विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.