इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याच्या घटना होत आहेत. यामध्ये कलासृष्टीतील अनेक कलाकारांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हिना खानने ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याचे सांगितले होते या बातमीनंतर चाहत्यांना धक्का बसला होता. परंतु आता अशीच काही घटना घडली असून अभिनेत्री रेचेल लिलिसने आपला जीव गमावला आहे. ब्रेस्ट कॅन्सरमुळे पोकेमॉन स्टारचं निधन झाले आहे. या बातमीमुळे एकच खळबळ उडाली असून लोक शोककळा व्यक्त करत आहेत.
‘पोकेमॉन’ या शोमधील लोकप्रिय ॲनिमेटेड पात्र मिस्टी आणि जेसी यांचा आवाज असलेल्या रेचेल लिलिसचे वयाच्या ४६व्या वर्षी १० ऑगस्टला निधन झाले आहे. अभिनेत्री स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त होती. आणि याच रोगामुळे तिने आपला जीव गमावला आहे. ‘पोकेमॉन’ या शोमधील मुख्य पात्र ॲश केचमचा आवाज असलेल्या वेरोनिका टेलरने तिच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिने तिच्या x अकाउंटला ही माहिती नोट केली असून तिने भावुक होऊन तिला श्रद्धांजली वाहिली आहे.
We all know Rachael Lillis from the many wonderful roles she played. She filled our Saturday mornings and before/after school hours with her beautiful voice, her terrific comic timing, and her remarkable acting skills. #RachaelLillis pic.twitter.com/XOjFqY0C1L
— Veronica Taylor (@TheVeronicaT) August 12, 2024
तिने या पोस्टमध्ये लिहिले की, मी अतिशय भावुक होऊन ही बातमी १० ऑगस्ट रोजी तुम्हाला सांगत आहे. शनिवारी संध्याकाळी रेचेल लिलिसचे निधन झाले आहे. रेचेलही एक अदभूत प्रतिभा होती, एक तेजस्वी प्रकाश होता जो तिच्या आवाजातून आणि बोलण्यातून चमकायचा. तिने आतापर्येंत साकारलेल्या ॲनिमेटेड भूमिकेसाठी ती नेहमी लक्षात राहील. ज्यामध्ये ‘पोकेमॉन’ मधील मिस्टी आणि जेसी हे पात्र जास्त चर्चेत आहे. तिने कॅन्सरला लढा दिल्यानंतर सर्वांचे आभार मानले आणि प्रेम व्यक्त केले.” असं ती म्हणाली.
टीव्हीवरील अत्यंत प्रसिद्ध कार्टून पोकेमॉनमध्ये आता मिस्टी आणि जेसीचा आवाज ऐकायला मिळणार नाही. या कॅरेक्टरला आवाज देणारी स्टार रेचेल लिलिसचे निधन झाले आहे. ही अभिनेत्री 46 व्या वर्षाची होती आणि आता तिने या जगाचा निरोप घेतला आहे. हा आवाज छोट्या मुलाचा अत्यंत जवळचा आणि हवाहवासा होता. या अभिनेत्रीलादेखील ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यानंतर आता या हॉलिवूड स्टार ने या निदानामुळे आपला जीव गमावला आहे. अभिनेत्रीने अनेक व्हिडीओ गेमलाही आवाज दिला आहे.