
Baloch activist criticizes Pakistan government
त्यांनी अन्वर-उल-हक ककरा यांनी पाकिस्तानच्या लष्कराच्या हातातील कठपुतळी म्हटले आहे. तसेच बलुच नागरिकांच्या मृतदेहांवर पाय ठेवून पंतप्रधान झाल्याचेही खळबळजनक विधा केवे आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगान व्हायरल होत आहे. १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान ककर बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांच्यासोबत ओस्लोमध्ये गेले होते.
नॉर्वेजियन प्रतिनिधी आणि नागरी समाजाच्या अधिकाऱ्यांशी त्यांची बैठक होणार होती. यावेळी बलुचिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करणार होते. परंतु यावेळी एका बलुच कार्यकर्त्याने ककर यांच्यावर तीव्र टीका केली. तसेच त्यांनी बलुचिस्तानमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा, बलुच लोकांचा छळ केल्याचा आरोप सरकारवर केला. ही घटना ओस्लोमधील आंतरराष्ट्रीय चर्चेदरम्यान घडल्याने पाकिस्तानचा मोठा अपमान झाला आहे.
पाकिस्तानी सैन्य बलुच आर्मीच्या ताब्यात
बलोच कार्यकर्त्याचे हे विधान अशा वेळी आहे जेव्हा पाकिस्तानमध्ये बलुच आर्मी आणि पाकिस्तान लष्करामध्ये संघर्ष सुरु आहे. तसेच बलुच आर्मीने ७ पाकिस्तान सैनिकांना ताब्यात घेतले असून त्यांच्या सुटकेसाठी पोलिसांच्या अटकेत असलेल्या बुलच सैनिकांची मागणी केली आहेत. यासाठी बलुच आर्मीने सरकारला ७ दिवसांचा अल्टीमेटमही दिली आहे. पाकिस्तानी सरकारचा कोणताही प्रतिसाद न आल्यास सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे. सध्या बलुच लिबरेशन आर्मीचे पाकिस्तानी सरकार आणि लष्कराविरोधात ऑपरेशन हेरोफ २.० सुरु आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी या मोहिमेद्वारे केली जात आहे.
Breaking: A Baloch activist confronts caretaker prime minister of Pakistan Anwar-ul-Haq Kakar in Oslo, Norway, accusing him of being a puppet of Pakistani military generals and of standing on the dead bodies of Baloch civilians. pic.twitter.com/Cvx2TqJIjG — The Balochistan Post – English (@TBPEnglish) February 16, 2026
Ans: बलुच कार्यकत्याने पाकिस्तानचे माजी काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक ककर लष्कराच्या हातताले बाहुले असल्याचे आणि बलुच लोकांच्या मृतदेहांवरुन चालले असल्याची टिका केली आहे.
Ans: बलुच कार्यकर्त्याने ककर यांच्यावर तीव्र टीका करत त्यांनी बलुचिस्तानमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा, बलुच लोकांचा छळ केल्याचा आरोप सरकारवर केला आहे.
Ans: बीएलएने ७ पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतले आहे.