
फोटो सौजन्य - Social Media
सोशल मीडियावरही Michael चीच हवा आहे. चित्रपट पाहून आलेल्या अनेक प्रेक्षकांनी त्यांचा पर्सनल रिव्हिव्ह सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, सिनेमा भारतात यायच्या अगोदरच Michael च्या अनेक चाहत्यांनी सिनेमाची Booking करून ठेवली होती. सिनेमा स्क्रीन्सवर येण्याअगोदरच सिनेमाने 1.70 कोटींची कमाई केली होती. 24 एप्रिलला सिनेमा भारतात प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाने 3.70 कोटींची ओपनिंग केली तर पहिल्या दिवसाची टोटल ओपनिंग 5 कोटी सांगण्यात येत आहे. शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित झाला पण पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी या सिनेमाने हवाच केली. शनिवारी सिनेमाने 5.10 कोटींची कमाई केली. एकंदरीत, दोन दिवसात सिनेमाची भारतीय कमाई एकूण 10.5 कोटींची आहे.
Michael चा क्रेझ पाहता, येत्या दिवसात सिनेमा आणखीन कमाई करणार असल्याचे दिसून येत आहे. तर कमाईत मोठी वाढ होण्याचीही मोठी शक्यता आहे. Michael Movie मध्ये Michael Jackson चे पात्र त्याचाच पुतण्याने Jaafar Jackson साकारले आहे. Graham King ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. गेल्या एक महिन्यापासून अधिक काळ Box Office मध्ये गाजलेल्या धुरंधर 2 ला, Michael टक्कर देईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.