फोटो सौजन्य - Social Media
नक्की काय आहे Zee 5 ची ‘ती’ पोस्ट
Zee 5 ने केलेल्या या पोस्टमध्ये एक चिमुरडा दिसत आहे. त्याचे नाव शिवबा असून तो अभिनेत्री प्रिया बापटचा प्रचंड मोठा चाहता आहे. तो त्याच्या वडिलांना सांगतो की त्याला प्रिया बापट काकूंना भेटायचं आहे. वडील प्रश्न करतात की तू त्याला कुठे भेटला आहेस का? तर तो प्रिया बापट आणि उमेश कामात यांची नवी सिरीज ‘हे काय नवीन’ याचं नाव घेऊन TV वर भेटल्याचे सांगतो. आपल्या चिमुरड्याचे हे छोटंसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवबा आणि त्याचे आई-बाबा प्रिया आणि उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा पुण्यातील प्रयोग पाहण्यासाठी येतात. House Full असलेल्या या प्रयोगादरम्यान शिवबाची भेट त्याच्या प्रिया बापट काकुंशी होते. प्रियाला भेटण्याचं या चिमुरड्याचं स्वप्न इथे पूर्ण होतं.
प्रिया बापटने ही केली पोस्ट
अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या सोशल मीडियाच्या माद्यमातून या संबंधित पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिचा छोटा चाहता शिवबा आणि प्रिया दिसून येत आहेत. कॅमेरामध्ये येण्यासाठी शिवबा लाजत आहे. परंतु, प्रियाने त्याला Star of the year असे टायटल दिले आहे.
Zee 5 च्या पोस्टखाली कलाकारांनी केले शिवबाचे कौतुक
Zee 5 च्या या पोस्टखाली या अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. कोकणची kokanheartedgirl ने “reaction भारी आहे ह्या मुलाची,डोक्यावर हात” असे कमेंट केले आहे. प्रियाच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले असून तिच्या ‘हे काय नवीन’ या सीरिजसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






