‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये एक आक्षेरपार्ह्य विधान केलं आणि एकाच रात्री सोशल मीडियावर प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया प्रकाशझोतात आला. आई- वडिलाबद्दल त्याने प्रश्न विचारला आणि अख्ख्या अश्लिलतेच्या सीमाच पार करणाऱ्या रणवीर विरोधात काल (१० फेब्रुवारी) एफआयआर दाखल करण्यात आली. टीका आणि ट्रोलिंग झाल्यानंतर रणवीर अलाहबादियाने एक्सवर (ट्विटर) एक व्हिडिओ शेअर करत माफी मागितली. सध्या सोशल मीडियासह सर्वत्र तुफान चर्चेत राहिलेल्या रणवीर अलाहबादियाबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तो कोण आहे ? त्याचं नेटवर्थ किती ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या बातमीतून समजून घेऊया…
युट्यूबने रणवीर इलाहाबादियाचा वादग्रस्त व्हिडिओ केला डिलीट, नोटीस मिळाल्यावर केली कारवाई!
वयाच्या २२ व्या वर्षापासून तो युट्यूबवर व्हिडिओ बनवतोय. त्याच्या व्हिडिओंची फक्त आजच नाही तर, यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे. पॉडकास्ट, स्टायलिश लूक आणि फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिलेला रणवीर व्हिडिओच्या माध्यमातून करोडोंची कमाई करत लक्झरियस लाईफ जगतोय. रणवीर आपल्या युट्यूब चॅनलवर राजकीय नेते, बॉलिवूड, टॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटी, बिझनेसमन्स आणि ज्योतिषी यासोबतच विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांचा तो मुलाखती घेत असतो. त्याने घेतलेल्या मुलाखतींच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चाही होते. मुळचा मुंबईकर असलेला रणवीर एकूण ७ युट्यूब चॅनल्स चालवतो. त्यातून त्याला महिन्याला लाखो रुपये मिळतात. गेल्या वर्षी (२०२४ मध्ये) रणवीरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला गौरवण्यात आलं होतं.
ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
कोण आहे रणवीर अलाहबादिया ?
२ जून १९९३ रोजी मुंबईत जन्मलेल्या रणवीरने मुंबईतील सुप्रसिद्ध स्कूल धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. द्वारकादास जीवनलाल संघवी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.टेकचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांने वयाच्या २२ व्या वर्षी त्याचे यूट्यूब चॅनेल सुरू केले. तो ७ यूट्यूब चॅनेल चालवतो, त्यापैकी एक बीअरबायसेप्स आहे. त्याच्या चॅनेलवर १ कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.
कोइमोईने दिलेल्या रिपोर्टनुसार, रणवीर त्याच्या BearBiceps चॅनलसह इतर YouTube चॅनेलवरून 35 लाख रुपयांहून अधिकची कमाई करतो. याशिवाय यूट्यूब जाहिरात, रॉयल्टी, ब्रँड प्रमोशन असे अनेक त्याच्याकडे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. २०२४ मध्ये त्याची एकूण संपत्ती ६० कोटी रुपये इतकी होती. याशिवाय रणवीर Monk Entertainment चा सह-संस्थापकही आहे. करोडोंची कमाई करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाकडे मुंबईत स्वतःचे घरही आहे. याशिवाय त्याच्याकडे स्कोडा कोडियाक कार आहे. ज्याची किंमत जवळपास ४० लाख रुपये आहे.
रणवीर अलाहबादिया अचानक चर्चेत का आला ?
प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाने शोमधील एका स्पर्धकाला एक वादग्रस्त प्रश्न विचारला. ‘तुम्हाला तुमच्या आईवडिलांना आयुष्यभर दररोज जवळीक साधताना पहायचे आहे की तुम्हाला फक्त एकदाच त्यांच्यासोबत सामील व्हायचे आहे?’ असा विचित्र आणि अश्लील प्रश्न त्याने भरशोमध्ये एका स्पर्धकाला प्रश्न विचारला. या प्रश्नामुळे रणवीरला सर्वत्र ट्रोल करण्यात आले. त्याच्याविरुद्ध एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. टीका झाल्यानंतर रणवीरनं व्हिडिओ शेअर करत माफी मागितली आहे.