(फोटो सौजन्य - युट्यूब)
मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार आणि ग्रामीण लेखक म्हणून लोकांच्या मनावर राज्य करणारे रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांचे आज निधन झाले. यांनी वयाच्या ८५ वर्षी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना ‘पाचोळा’कार बोराडे हे नामभिमान मिळाले होते. या साहित्यातून मराठवाडी बोलीचे अनेक विशेष स्थान मिळाले होते. तसेच या दुःखद बातमीने आता मराठी सिनेमासृष्टीत खळबळ उडाली आहे. आणि चाहत्यांसह कलाकांमध्ये शोककळा पसरली आहे.
साधं आणि सहज वाचकांच्या हृदयाचा स्थान मिळवलेली शैली हे रावसाहेब रंगराव बोराडे यांच्या लिखाणाचे वैशिष्ट आहे. चाहत्यांना त्याने लिखाण खूपच भावते. बोराडे यांच्या कथांचा प्रत्येक शेवट हा धक्कादायक असतो. जी वाचकांचं नक्कीच मन जिंकून जातो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यासह बोराडे यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीची वाचकांना भेट होते. त्यांचे सर्व कथा वाचकांचं मन जिंकतात. अश्या ज्येष्ठ साहित्यिकाची बातमी ऐकून वाचकांना धक्का बसला आहे.
युट्यूबने रणवीर इलाहाबादियाचा वादग्रस्त व्हिडिओ केला डिलीट, नोटीस मिळाल्यावर केली कारवाई!
लातूर जिल्ह्यातील काटगावमध्ये २५ डिसेंबर १९४० रोजी बोराडे यांचा जन्म झाला. या गावात एकही शाळा नव्हती. मात्र वडील शिक्षणाप्रती सजग असल्याने त्यांनी शिक्षण घेण्याचा मार्ग निवडला. शिक्षण घेतल्यानंतर त्यांना एवढे यश प्राप्त झाले की, स्वतः बोराडे पुढे महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ग्रामीण महाराष्ट्रात होत गेलेली स्थित्यंतरे, नातेसंबंधांतील बदल, बदलते समाजजीवन अतिशय आस्थेने, संवेदनशीलतेने टिपणारा लेखक ही रा. रं. बोराडे यांची महाराष्ट्राला असलेली मुख्य ओळख आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बहुजन समाजातील पहिल्या पिढीच्या अंगणात शिक्षणाचा प्रकाश पसरवणारे बोराडे हे प्रतिनिधी ठरले. त्यांच्या नजरेत भोवतालाचे विश्लेषण करण्याची बौद्धिक क्षमता प्रचंड होती. त्यांच्या अंगी लेखनकौशल्य जास्त होते. त्यातूनच त्यांचे साहित्य ताकदीने उभे राहिले. आणि चाहत्यांच्या हृदयात बसले.
विसाव्या शतकातील उत्तरार्धात महाराष्ट्रातील ग्रामीण भाग कसा बदलत गेला, हे जाणून घ्यायचे असेल तर बोराडे यांची पुस्तके नक्कीच वाचकांनी वाचायला हवी. ग्रामीण भागातील माणसांची सुखदुःखे, आशाआकांक्षा, उजेड-काळोख असा सारा ऐवज त्यांच्या साहित्यात अनुभवयाला मिळतो. ग्रामीण माणसांचे अतिशय वास्तव चित्रण बोराडे यांनी केले आहे. खऱ्या अर्थाने मराठी मातीतुन आलेला असा हा लेखक आहे. ज्यांनी वाचकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदापासून ते इतर अनेक जबाबदाऱ्या बोराडे यांनी निष्ठेने आणि जबाबदारपणे सांभाळल्या आहेत. सन २०२४ साठीचा राज्य सरकारचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार बोराडे यांना शुक्रवारी जाहीर झाला. बोराडे हे या पुरस्काराचे सर्वार्थाने धनी आहेत. त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले. आता त्यांच्या या बातमीने सर्वत्र शोककळा पसरली असून, त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.