फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या शार्लिन चोप्राचा (Sherlyn Chopra)आज वाढदिवस आहे. चित्रपटांमुळे नाही तर, आपल्या वादग्रस्त विधानामुळे आणि हॉट अँड बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल म्हणजे शर्लिन चोप्रा होय. शर्लिन चोप्रा कायमच आपल्या चाहत्यांमध्ये अडल्ट सीनमुळे चर्चेत राहिली आहे. आज ही अभिनेत्री आपला 38 वा वाढदिवस (38th Birthday) साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त काही चर्चेत राहिलेल्या मुद्द्यांवर नजर टाकूया…
शर्लिन चोप्राचा जन्म ११ फेब्रुवारी १९८७ रोजी हैदराबादमध्ये झाला होता. तिचं शिक्षण सिकंदराबादमध्ये पूर्ण झालं आहे. सध्याचा शर्लिनचा स्वभाव बघता कुणाला खरं वाटेल की, ती लहानपणी अतिशय शांत आणि विनम्र स्वभावाची होती. शांत आणि लाजऱ्या स्वभावाच्या असलेल्या शर्लिनने तिच्या वाट्याला प्रसिद्धी न आल्याने तिने पुढे जाऊन न्यूड फोटोशूट करायचे ठरवले. खरंतर, शर्लिन चोप्राने मिळेल त्या भूमिका करून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. परंतु तिच्या वाट्याला काही खास भूमिका आल्या नाहीत. त्यामुळे ती अडल्ट चित्रपटांकडे वळाली. तिने अनेक हॉट अँड बोल्ड सीन्स दिले आहेत.
कायमच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या शर्लिन चोप्राच्या वाढदिवसानिमित्त तिच्या काही चर्चेत राहिलेल्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया… शर्लिन चोप्रा २००९ मध्ये टेलिकास्ट झालेल्या ‘बिग बॉस ३’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिने शोमध्येही आपल्या हॉटनेसचा जलवा दाखवत सर्वांचेच लक्ष वेधले होते. ‘बिग बॉस ३’मध्ये तिने बाथरूममध्ये कॅमेरा बसवण्याचीही मागणीही केली होती. शर्लिन चोप्राने म्हणाली होती की, तिला बाथरूममध्ये कॅमेऱ्यासमोर आंघोळ करायला आवडेल. निर्मात्यांनी शर्लिन चोप्राची ही मागणी मान्य करण्यास साफ नकार दिला होता. बिग बॉसमधून तिला तीन आठवड्यांत बाहेर काढण्यात आले होते. त्यांनतर ती प्रचंड चर्चेत आली होती.
मिलिंद गुणाजीची माथेरान सफर, लुटला निसर्गाचा मनमुराद आनंद…
काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीने ‘प्लेबॉय’मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करत सर्वत्र खळबळ माजवली होती. असं काही विचित्र कृत्य करणारी ती पहिलीच भारतीय मॉडेल होती. त्यानंतर तिने याला आपली गरज असल्याचं म्हटलं होतं. ती म्हणाला होती, ‘बॉलिवूडने तिला असं बनवलं आहे. मला काम मिळत नसताना मला बोल्ड सीन द्यायला भाग पाडलं गेलं.’यासह तिचे अनेक मुद्दे चर्चेत राहिले आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिला विचारण्यात आले होते की, तुला राहुल गांधींसोबत लग्न करायला आवडेल का? या प्रश्नावर ती उत्तर देताना दिसत आहे. पण तिने त्यासाठी अटही घातली होती. तेव्हाही ती सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली होती.
ममता कुलकर्णीने दिला ‘महामंडलेश्वर’ पदाचा राजीनामा; म्हणाली, “साध्वी होती, साध्वीच राहिन…”
राहुल गांधींसोबत लग्न करायला आवडेल का? या प्रश्नावर शर्लिनने स्पष्टपणे उत्तर देताना एक अटही घातली होती. ती म्हणाली की, लग्नानंतर तिचे आडनाव ती गांधी न ठेवता चोप्राच ठेवेल, ते बदलणार नाही. अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला. त्यासोबतच तिला तुफान ट्रोलही केलं होतं. विचित्र विधाने करून चर्चेत येण्याची शर्लिनची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती अनेकदा वादात सापडली आहे. तिच्या वक्तव्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात येत असते.