(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
युट्यूबर रणवीर इलाहाबादिया समय रैनाच्या ‘इंडिया गॉट लेटेंट’ या युट्यूब शोवरील वादग्रस्त टिप्पणीमुळे चर्चेत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या प्रकरणी युट्यूबला नोटीस बजावली आहे. तसेच, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानुंगो यांनीही व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युट्यूबने यावर कारवाई करत व्हिडिओ काढून टाकला आहे. तसेच आता युट्यूबर रणवीर इलाहाबादियावर कारवाई केली जाणार आहे.
ममता कुलकर्णीने दिला ‘महामंडलेश्वर’ पदाचा राजीनामा; म्हणाली, “साध्वी होती, साध्वीच राहिन…”
कुटुंबावर असभ्य टिप्पण्या
रणवीर इलाहाबादियाने समय रैनाच्या शोमध्ये पालकांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आहे. आता या टिप्पणीवर वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडिया आणि प्रसारण मंत्रालयाने युट्यूबला नोटीस बजावली होती. या प्रकरणावर वाढत्या वादानंतर आणि नोटीस मिळाल्यानंतर YouTube ने कारवाई केली आहे. आणि तो व्हिडीओ आता युट्यूबने डिलीट केला आहे.
एफआयआर दाखल, युट्यूबरचा तीव्र विरोध
‘इंडिया गॉट लेटेंट’ वर रणवीर इलाहाबादिया यांनी केलेल्या कमेंटचा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला. याबद्दल सोशल मीडियावर लोक रणवीरला ट्रोल करत आहेतच, पण देशभरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप व्यक्त केला आहे. रणवीरचे हे विधान संस्कृती आणि परंपरांविरुद्ध असल्याचे सांगत त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात रणवीर इलाहाबादिया, समय रैना आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Ed Sheeran: एड शीरन दिसला अरिजीतसोबत स्कूटरवर फिरताना; Viral Video ने जिंकले चाहत्यांचे मन!
रणवीरविरुद्ध अनेक तक्रारी दाखल
रणवीर इलाहाबादिया आणि इतरांविरुद्ध मुंबईत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत आणि आसाममध्येही युट्यूबरविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेता मुकेश खन्ना यांनी या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. मुकेश खन्ना यांनी केवळ रणवीर आणि समय यांनाच फटकारले नाही तर त्यांचे भाषण ऐकून टाळ्या वाजवणाऱ्या प्रेक्षकांनाही फटकारले. याशिवाय अनेक राजकीय व्यक्तींनीही या संपूर्ण प्रकरणावर टीका केली आहे.