Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iblis Movie Trailer: एक शाळा, एक बंड अन् इतिहासाशी झालेली गाठ; ‘इबलिस’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

एक शाळा, एक बंड, आणि इतिहासाशी झालेली गाठ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच मान्यवरांच्या उपस्थितीत इबलिस या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईमध्ये जल्लोषात संपन्न झाला.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 11, 2025 | 04:17 PM
एक शाळा, एक बंड अन् इतिहासाशी झालेली गाठ; ‘इबलिस’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

एक शाळा, एक बंड अन् इतिहासाशी झालेली गाठ; ‘इबलिस’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

एक शाळा, एक बंड, आणि इतिहासाशी झालेली गाठ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच मान्यवरांच्या उपस्थितीत इबलिस या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईतील प्लाझा सिनेमा येथे जल्लोषात संपन्न झाला. या सोहळ्याला चित्रपटाची निर्माती प्राजक्ता चौधरी, दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र, संगीतकार चैतन्य अडकर तसेच अभिनेत्री पूनम शेंडे, मंगेश सातपुते आणि चित्रपटातील बालकलाकार वंदन वेलदे, अथर्व देशमुख, तन्मय लोहगावकर, ओवी कुलकर्णी, जान्हवी बोरसे, अंकिता दीक्षित, मृणाल नेहते, कारुण्य धुमाळी, अंकुर राव, शर्विन मुळे, रसिका बऱ्हाटे आणि कोरिओग्राफर लाभेश सोलंकी देखील उपस्थित होते.

डोळ्यात अंजन घालणाऱ्या ‘निबार’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, शिक्षणासह समाजव्यवस्था घटकावर करणार भाष्य

हा चित्रपट येत्या २० जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. बंदुक्या फेम दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी यांनी इबलिस या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेते नामदेव मुरकुटे यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तेशा गर्ल चाइल्ड प्रोडक्शन, सार्थी एंटरटेनमेंट आणि प्राजक्ता राहुल चौधरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. विजय निकम, पूनम शेंडे, अशोक केंद्रे, मंगेश सातपुते, नामदेव मुरकुटे आणि राजेश आहेर हे प्रमुख कलाकार असून यात ११ लहान मुलांनी देखील या चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे.

गायिका सावनी रविंद्र यांनी या चित्रपटातील मिरची सिंगापूरची हे गाण गायल आहे. त्या चित्रपटाविषयी आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगविषयी म्हणाल्या, “खरंतर मी दिग्दर्शक राहुल चौधरी यांचे आभार मानते की त्यांनी मला या चित्रपटातील गाणं गायची संधी दिली. मी आजवर शास्त्रीय संगीत आणि रोमँटिक गाणी गायली आहेत. पहिल्यांदाच मी मिरची सिंगापूरची हे आयटम गाणं गायलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं मी ७ वर्षापूर्वी गायलं होतं परंतु कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शीत झाला नाही. आता ७ वर्षानंतर हा चित्रपट येत आहे म्हणून मीच राहुल सरांना सांगून हे गाणं नुकतंच पुन्हा फ्रेश रेकॉर्ड केल आहे. तुम्ही हे गाणं प्राची म्युझिक या युट्यूब चॅनेलवर नक्की बघा. आणि येत्या २० जूनला इबलिस हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.”

“हो, मी बाबा होणार आहे…”, ५७ वर्षीय अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा होणार; अभिनेत्याने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया…

दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी ‘इबलिस’ चित्रपटाविषयी सांगतात, “’इबलिस’ हा उर्दू शब्द आहे. अतिबुद्धिमान आणि सगळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लहान मुलांना गावाकडे इबलिस म्हणून संबोधले जाते. या चित्रपटात अशीच ११ लहान मुल आहेत त्यामुळे या चित्रपटाचं नाव इबलिस ठेवलं आहे. २०१७ – २०१८ मध्ये माझ्या बंदुक्या या चित्रपटाला जे यश मिळाल, अनेक पुरस्कार मिळाले, भरभरून प्रेम मिळाल. त्यामुळे सामाजिक विषयांना धरून मनोरंजक चित्रपट करावा अस मी ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लहान मुलांमध्ये कसे रुजवू शकतो हा विचार मी करत होतो. मग मी ६ महिने रिसर्च करून अनेक वर्कशॉक घेवून तसेच या चित्रपटाचे लेखक नामदेव मुरकुटे यांच्याशी चर्चा करून हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. नुकतच रिलीज़ झालेल्या इबलिस चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा चित्रपट येत्या २० जूनला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट आपल्या मुलांसोबत आणि कुटुंबासमवेत जरूर पहावा.”

Web Title: Iblis marathi movie trailer launch this movie released on 20th june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 04:17 PM

Topics:  

  • marathi film
  • Marathi Film Industry
  • marathi movie

संबंधित बातम्या

मराठी सिनेमाचा ऐतिहासिक क्षण, ऑस्करच्या दारात पोहोचला प्रभावळकरांचा ‘दशावतार’, मुख्य श्रेणी स्पर्धेत चित्रपटाची निवड
1

मराठी सिनेमाचा ऐतिहासिक क्षण, ऑस्करच्या दारात पोहोचला प्रभावळकरांचा ‘दशावतार’, मुख्य श्रेणी स्पर्धेत चित्रपटाची निवड

Savitribai Phule Jayanti : ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चित्रपटाच्या टीमकडून जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
2

Savitribai Phule Jayanti : ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चित्रपटाच्या टीमकडून जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Tighee Movie: तीन स्त्रिया, एक भावस्पर्शी कथा, पीआयएफएफच्या मराठी सिनेमा कॉम्पिटिशन विभागात ‘तिघी’ची अधिकृत निवड
3

Tighee Movie: तीन स्त्रिया, एक भावस्पर्शी कथा, पीआयएफएफच्या मराठी सिनेमा कॉम्पिटिशन विभागात ‘तिघी’ची अधिकृत निवड

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.