सोनी मराठी(Sony Marathi) वाहिनीवर २२ नोव्हेंबर रोजी सुरू होणार्या ‘इंडियन आयडॉल मराठी’ (Indial Idol Marathi)या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ हे ब्रीदवाक्य असलेल्या ‘इंडियन आयडॉल मराठी’ या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ही संस्था करत आहे. प्रादेशिक भाषेत इंडियन आयडल पहिल्यांदाच सुरू होणार असून, त्याला साजेसे परीक्षकही लाभले आहेत. संगीतविश्वातली एक नावाजलेली आणि लोकप्रिय जोडी अजय-अतुल (Ajay Atul Will Be A Judge Of Indian Idol Marathi) या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत.
[read_also content=”परमबीर सिंह यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर येणार टाच, बेनामी मालमत्तेचाही शोध सुरु – क्राईम ब्रँचच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे, मालमत्ता जप्तीची तयारी सुरु https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/parambir-singh-property-to-be-seized-by-crime-branch-nrsr-204111.html”]
इंडियन आयडॉलच्या ऑडिशनला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे एकापेक्षा एक कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ऑडिशनला आले होते. त्यामुळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम गायक/गायिका महाराष्ट्राला मिळतील, यात शंका नाही. अजय-अतुल त्यांच्या सांगीतिक प्रवासाचे रसिक साक्षीदार आहेत.
आवाजाच्या आणि स्वरांच्या साथीनं स्वतःच्या पायावर उभं राहू पाहणाऱ्या मुलांचं स्वप्न सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून रसिकांना बघता येणार आहे. देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल आता महाराष्ट्रासाठी आवाज शोधणार ही उत्सुकतेची बाब आहे.






